साहित्य संमेलनातही खोके, सुरज आणि गुवाहाटीचीच चर्चा ; उद्धव ठाकरेंनी साधला मोदींवर निशाणा..

Uddhav Thackeray : जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे आजपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उद्घाटनपर भाषणात भाजप आणि गटावर निशाणा साधला.

जालना : “मराठवाडा साहित्य परिषदेचे ४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन’ घनसावंगी येथे  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक शेषराव मोहिते यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला. (Targeting Modi from the platform of Sahitya Samelan..)

अधिक वाचा : Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg : नेमका कसा आहे मुंबई-नागपूर समृध्दी महामार्ग?

उद्धव ठाकरे यांनी लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी निवडून दिलेल्या मताची किंमत खोक्यामध्ये असे आहे का? आता आपल्याकडे गुप्त मतदान आहे. मात्र नागरिकांनी दिलेले मत त्यांना तरी माहित आहे का? कुणाकडे जाणार आहे आणि कुठून-कुठे जाणार आहे.

अधिक वाचा : Police recruitment : आता तृत्तीयपंथींच्या अंगावरही चढणार अभिमान वाढणारी खाकी वर्दी

ट्रॅव्हल एजन्सी सुरत, गुवाहाटी आणि दिल्ली असे कधी इकडे कधी तिकडे असे मतदान मतदारांपासून गुप्त होऊ लागले आहेत. असे कसे चालेल, अशी लोकशाही आपण मानणार नाही, असे सुनावताच लोकशाहीचा अर्थ असा लावणार असाल तर देशातील लोकशाही संपली असे एकदा जाहीर करून टाका. तुम्ही कोणालाही मतदान केले तर त्याला आम्ही खोक्यात बसून आमच्याकडे घेऊन टाकू अशी परिस्थिती असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी