छ. संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड-पाचोरा रस्त्यावर आज एसटी बस आणि गॅस सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सुमारास १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. (Terrible accident of ST bus in Sambhajinagar)
अधिक वाचा : कर्जत-सीएसटी अंतर होणार कमी ; नवीन रेल्वे कॉरिडॉरने प्रवाशांचे 25 मिनिट वाचणार
सिल्लोड-पाचोरा ही एसटी बस सिल्लोडकडून पाचोराकडे जात होती. यामध्ये बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. बस वांगी फाट्याजवळ येत असताना समोरून गॅस वाहतूक करणारा टेम्पो भराडीकडून सिल्लोडला येत होता. दोन्ही वाहन चालकांचा ताबा सुटल्याने दोघांनी वाहनांची समोरासमोर धडक झाली. तिघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, तर गॅस वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालकाचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढावा लागला.
अपघातग्रस्त बसमधून अपघातानंतर सर्व जखमींना उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी असलेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.