Attack on Sharad Pawar's residence : औरंगाबाद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. 'सिल्व्हर ओकवर वरती जो काही हल्ला झाला तो हल्ला माझ्या आईवर होता' असा खळबळजनक खुलासा राष्ट्रवादीच्या खासदार सुळे (supriya sule) यांनी केला आहे. सुप्रिया सुळे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( sharad pawar house attack) यांच्या मुंबई येथील निवासस्थानी हल्ला झाल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी बोलताना सदर धक्कादायक खुलासा केला आहे. खासदार सुप्रिया सुळे या आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी सिल्व्हर ओकवरील हल्ल्या प्रकरणात पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. (the attack on silver oak was on my mother - supriya sule )
अधिक वाचा ; अंगारकी चतुर्थी च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status
दरम्यान, पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ईडीच्या रेड्सचा विक्रम झाला असून, अनिल देशमुख यांच्यावर १०३ धाडी टाकण्यात आल्या आहेत. देशमुख यांच्यावर फक्त आरोप होत आहेत सिद्ध अजून काही होत नाही आणि पुढेही काही सिद्ध होणार नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अधिक वाचा ; अॅम्वेवर एमएलएम घोटाळ्याचा आरोप...757 कोटींची मालमत्ता जप्त
'सिल्व्हर ओकवरती झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना सुळे म्हणल्या की, मला हे आजही अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं आहे. मी हल्ल्यानंतर पोलिसांना संपर्क केला होता आणि त्यांना विनंती केली होती की, ज्या महिलांनी हल्ला केला आहे, त्या महिलांशी मला बोलू द्या, त्यांना मला भेटायचं आहे. त्यांचं नेमकं दु:ख काय आहे, हे मला समजून घ्यायचं आहे. महाराष्ट्रातील एक महिला म्हणून मला जाणून घ्यायचं आहे, असं ही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
अधिक वाचा ; खिसा खाली करणारी बातमी, लिंबू महागला, धुळ्यात 200 रुपये किलो