धक्कादायक! सुमारे ५ तास खासगी रूग्णालयाबाहेर पडून होता कोरोनाबाधीताचा मृतदेह, नाही आली कोणाला दया!

औरंगाबाद
Updated May 04, 2021 | 16:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

The body was lying outside a private hospital for about 5 hour: ६५ वर्षीय कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाचा मृतदेह पडला होता. सदर मृतदेह हा बेवारस अवस्थेत असल्याने मृतदेहाकडे कोणीच पहायला तयार नव्हते.

The body was lying outside a private hospital for about 5 hour
सुमारे ५ तास खासगी रूग्णालयाबाहेर पडून होता मृतदेह   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • दवाखान्या बाहेर येताच सोनटक्के कोसळून पडले
  • कोरोनाच्या टेस्टनंतर तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस
  • मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आला

उस्मानाबाद : राज्यात कोरोनाची (corona) संख्या वाढताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या संख्येसोबत मृतांचा देखील आकडा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दरम्यान, कोरोना आल्यापासून माणुसकी देखील संपत असल्याचे पहायला मिळत आहे. उस्मानाबाद तालुक्यातील (osmanabad taluka) तेर येथील एका खासगी दवाखान्यासमोर एका ६५ वर्षीय कोरोना पाँझिटीव्ह रूग्णाचा मृतदेह पडला होता. सदर मृतदेह हा बेवारस अवस्थेत असल्याने मृतदेहाकडे कोणीच पहायला तयार नव्हते. लोकं त्या ठिकाणाहून ये-जा करत असताना मृतदेहाला पाहून जात होते. मात्र, त्याला कोणीच उचलायला तयार झाले नाही. सुमारे पाच तास हा मृतदेह उघड्यावर पडून होता त्यामुळे नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दवाखान्या बाहेर येताच सोनटक्के कोसळून पडले

सदर मृत व्यक्तीचे नाव छगन मेसबा सोनटक्के असं असून, ते ६५ वर्षाचे आहेत. छगन मेसबा सोनटक्के हे किणी या गावचे रहिवासी होते. तीन  मे रोजी सकाळी ते तेर येथील बसस्थानकाजवळील एका खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी आले होते, यावेळी या दवाखान्यातील डाॅक्टरानी सोनटक्के यांची तपासणी करुन  त्यांना शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचा सल्ला ऐकून सोनटक्के हे दवाखान्या बाहेर येऊ लागले दरवाज्या समोर आल्यानंतर ते कोसळून खाली पडले. पडताच क्षणी सोनटक्के यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या टेस्टनंतर तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस

दरम्यान या घटनेची माहिती ढोकी पोलिसांना कळविण्यात आली, यावेळी पोलिसांनी पंचनामा केला. पंचनाम्यानंतर या रुग्णाची तेरच्या ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खासगी दवाखान्यासमोर रँपीड अँन्टीजन टेस्ट केली, त्यात सोनटक्के कोरोना पाँझिटीव्ह आढळून आले. विशेष म्हणजे सोनटक्के यांच्या कोरोनाच्या टेस्टनंतर देखील तब्बल पाच तास सोनटक्के यांचा मृतदेह बेवारस अवस्थेत पडून होता. त्यामुळे नागरिकांसह नातेवाईकामधून प्रशासकीय यंत्रणेच्या ढिसाळ व नियोजन शुन्य कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान दोन वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांच्या मदतीने तेर ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह पीपीई कीटमध्ये घातला.  एवढ्यावरच मृतदेहाची हेळसांड थांबली नाही. यावेळी मृतदेह घेऊन जाण्यासाठी नातेवाइकांना साधे वाहन सुध्दा लवकर मिळाले नाही. त्यानंर घंटा गाडीत मृतदेह घेऊन जाण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. 

 

मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आला

अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह किणी ग्रामपंचायतच्या ताब्यात देण्यात आला. विशेष म्हणजे आजच्या या किळसवाण्या घटनेवरून आरोग्य यंत्रणा , ग्रामपंचायत व इतर प्रशासकीय यंत्रणेचा गावातील कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, हे आजच्या घटनेवरून दिसून आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी