गरिबीची क्रूर कहाणी, पेरणीमुळे घेतला नाही टॅब, शाळकरी मुलाची आत्महत्या

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 20, 2020 | 10:41 IST

ग्रामीण भागातील शाळांसाठी सुरळीत वीजपुरवठा हा गंभीर प्रश्न आहे. काही शाळांना अनुदान वेळेवर मिळाले नाही. शाळांच्या वीजबिलाची थकबाकी वाढली आणि कनेक्शन तोडण्यात आले. त्यामुळे विजेअभावी ऑनलाईन शिक्षण कठीण आहे.

The brutal story of poverty, the tab not taken because of sowing, the suicide of a schoolboy
गरिबीची क्रूर कहाणी, पेरणीमुळे घेतला नाही टॅब, शाळकरी मुलाची आत्महत्या   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पेरणी झाल्यावर घेणार होते टॅब
  • ग्रामीण भागात विजेजा तुटवडा
  • राज्यातील अनेक शाळांमध्ये नाही वीज

बीड: नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या एका विध्यार्थ्याने (student sucide ) वडिलांनी  टॅब न घेऊन दिल्याने नाराज झालेल्या टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव अभिषेक राजेंद्र संत असे आहे. बीड(beed) जिल्ह्यातील गेवराई(gevarai) तालुक्यातील भोजगाव इथे ही घटना घडली आहे.

पेरणी झाल्यावर घेणार होते  टॅब 

यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना(farmer) चांगलाच दिलासा दिला असून सध्या शेतकरी  शेतात पेरणीसाठी लगबग करत आहे. त्यातच मुलांचे शिक्षण(education) म्हणजे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील भलतेच मोठे ओझे म्हणावे लागेल. अभिषेकने वडिलांकडे ऑनलाइन(online) शिक्षणासाठी  टॅब (tab) घेण्यासाठी तगादा लावला होता. वडिलांनी देखील अभिषेकला पेरणी झाल्यावर  टॅब घेऊन देतो अस समजावून सांगितले होते.मात्र हट्ट धरलेल्या अभिषेकने टॅब न घेतल्याने हताश होऊन टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवाली आहे.

यामुळे होतोय ऑनलाइन(online) शिक्षणाला विरोध

सध्या देश्सात आणि राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांना घरात बसूनच ऑनलाइन शिक्षण देण्यात येणार असल्याचे सरकार कडून सांगितले जात आहे. मात्र हा खटाटोप करत असताना पालकांकडे जर स्मार्ट फोने उपलब्ध नसेल तर  ऑनलाइन शिक्षण देणार कसे हा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागात अनेक पालकांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत. जर फोन उपलब्ध असेल तर त्याला रेंज नाही. त्यामेळे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागातील मुलांसाठी अवघड ठरणार आहे असंच म्हणावे लागेल.

राज्यातील अनेक शाळांमध्ये वीज देखील नाही

दरम्यान राज्यातील अनेक शाळा अश्या आहेत कि ज्या शाळांमध्ये वीजेची सुविधा उपलब्ध नाही. ग्रामीण अनुदानीत शाळांना राज्य शासनाकडून वेळेवर अनुदान मिळालेले नाही. अनुदान नसल्यामुळे शाळांच्या वीजबिलाची थकबाकी वाढत आहे. कंपन्या शाळांचे वीज कनेक्शन तोडत आहेत. शाळेत वीजेचा पुरवठा नसल्यामुळे शाळेच्या इमारतीमधून ऑनलाइन शिक्षण अशक्य आहे. मुलांकडेे वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे त्यांना कॉम्प्युटरपेक्षा मोबाईल किंवा टॅबवरुन ऑनलाइन शिकावे लागत आहे. पण ही यंत्रणा आणि इंटरनेटसाठी मोठा खर्च परवडत नसल्यामुळे ग्रामीण भागात मुलांची कुचंबणा झाली आहे.

ग्रामीण भागातील विजेजा तुटवडा

ग्रामीण भागात देखील  सध्या विजेचा मोठा तुटवडा असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. जर का ग्रामीण भागात विजेचा असाच तुटवडा सातत्याने राहिला तर फोन चार्गिंगचा देखील मोठा प्रश्न पालक आणि मुलांसमोर असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यापूर्वी ग्रामीण भागातील  विजेचा  प्रश्न मार्गी लावण्याची गरज असल्याची चर्चा ग्रामीण भागात सुरु आहे.

या विध्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण नाही

सरकराने ऑनलाइन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतल्या नंतर ऑनलाइन शिक्षणाबाबत पालकांच्या देखील मतांचा विचार केला गेला आहे. दरम्यान ६ ते ७ वयोगटातील पहिली आणि दुसरीला असणारे विध्यार्थी हे  लहान असतात. त्यामुळे या विध्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जाणार नाही. तिसरी ते पाचवीच्या वर्गातील मुलांना दररोज एक तास तर त्यापुढील विध्यार्थ्यांना दररोज २ तास ऑनलाइन शिक्षण दिले जाणार असल्याचे राज्याच्या शाळेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी