10 rupee coin, उस्मानाबाद : प्रवाशाने दिलेले १० रुपयाचे नाकारणे एसटी कंडक्टरला चांगलेचा महागात पडले आहे. तसेच या कंडक्टरला दंड देखील आकारण्यात आला आहे. प्रवाशाला वाईट वागणूक दिल्याप्रकरणी उस्मानबाद ग्राहक आयोगाने एसटी कंडक्टरला हा दंड ठोठावला आहे. सदर एसटी कंडक्टर हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी डेपोचा आहे. या निकालामुळे जे दुकानदार किंवा व्यापारी दहा रुपयाचे नाणे दहा रुपयांचे नाणे नाकारतात त्यांना धडा मिळाला आहे. त्यामुळे १० रुपयाचे नाणे पुन्हा एकदा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चलनात येतील ,अशी शक्यता देखील वर्तवली जाऊ लागली आहे.
अधिक वाचा ; ठाणे मनपा निवडणुकीसाठी ओबीसीच्या १५ जागांकरिता आरक्षण जाहीर
तर ही घटना घटना २२ मे २०१८ ची आहे. या दिवशी उस्मानाबाद येथील रहिवासी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद हे संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास बार्शी डेपोच्या एसटीने वैराग ते उस्मानाबाद येण्यासाठी एसटी बस क्रमांक (एमएच २० डी ८१६९) ने प्रवास करीत होते. यावेळी बसचे कंडक्टर बी.वाय.काकडे यांनी प्रवाशी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांना तिकीट काढण्यासाठी पैसे मागितले. यावेळी अल्लाऊद्दीन बक्षु सय्यद यांनी अपंगत्वाचे ओळखपत्र दाखवले आणि सय्यद यांनी कंडक्टर काकडे यांना १० रुपयाचे नाणे दिले. यावेळी काकडे यांनी १० रुपयाचे नाणे चालत नाही, असं सय्यद यांना सांगितले आणि १० रुपयाचे नाणे परत केले.
अधिक वाचा : मुंबई विमानतळाजवळील 48 इमारती पाडण्यात येणार, डीजीसीएचा आदेश
यानंतर सय्यद यांनी थेट ग्राहक आयोगाकडे एसटी कंडक्टर काकडे आणि बार्शी डेपोविरोधात तक्रार केली. त्यानंतर सदर प्रकरणाचा आता म्हणजेच ४ वर्षांनी उस्मानबाद ग्राहक आयोगाने कंडक्टरविरूद्ध निकाल दिला आहे. त्यात अर्जदाराला आठ हजार रूपये देण्याचे आदेश केले आहेत.
अधिक वाचा : मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराथींचे योगदान
दहा रुपयांचे नाणे हे भारतीय चलनात असून ते कोणालाही नाकारता येत नाही. 10 रुपयांची सर्व नाणी वैध असून स्वीकारण्यायोग्य आहेत. त्यामुळे या नाणांच्या माध्यमातून व्यवहार होऊ शकतो.' असंही रिझर्व बँकेनं स्पष्ट केलं आहे. ही सर्व नाणी वेगवेगळ्या फीचर्समध्ये आहेत. त्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे विविध पैलू प्रदर्शित होतात. मात्र, बहुतेकदा काही ग्राहक चिल्लर सांभाळायला अडचण नको म्हणून दहाचे नाणे स्वीकारत नाहीत. नाणे सांभाळण्याची गैरसोय टाळण्यासाठी काही जण दहा रुपयाच्या नोटेची मागणी करताना दिसतात.