Crime News घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीने पत्नीवर केले कटरने वार

The husband stabbed his wife with a cutter: परभणीतील न्यायालयाच्या आवारातच ही भयंकर घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ तसेच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टाच्या परिसरातच पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

The husband stabbed his wife with a cutter
घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीने पत्नीवर केले कटरने वार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • न्यायालयाच्या परिसरात पतीने आपल्या पत्नीवर कटरने वार केले
  • परभणी न्यायालयात या दोघा पती पत्नीच्या घटस्फोटाबाबत सुनावणी सुरु होती
  • सुनावणी सुरु असताना पत्नी वैष्णवीने तडजोड करण्याबाबत नकार दिल्यामुळे पतीने केले वार

रभणी : न्यायालयाच्या परिसरात पतीने आपल्या पत्नीवर कटरने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर घटना परभणी (Parbhani) येथे घडली आहे.  घटस्फोटाच्या सुनावणीसाठी आलेल्या पतीने न्यायालयातच भयानक कृत्य केले  असल्याची माहिती मिळाली असून, घटस्फोटाची सुनावणी (Divorce Hearing) न्यायालयामध्ये सुरु असताना तडजोड न झाल्याने रागावलेल्या पतीने हे कृत्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (The husband stabbed his wife with a cutter)

अधिक वाचा ; Investment Tips: सुरक्षित गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय कोणते?

नेमकी काय घडली घटना?

पत्नीच्या गळ्यावर वार करणाऱ्या पतीचे नाव ज्ञानेश्वर खनपटे असं आहे. तर, पतीने पिडीत पत्नीचे नाव वैष्णवी खनपटे असं आहे. परभणी न्यायालयात या दोघा पती पत्नीच्या घटस्फोटाबाबत सुनावणी सुरु होती. सुनावणी सुरु असताना पत्नी वैष्णवीने तडजोड करण्याबाबत नकार दिल्यामुळे पतीला राग आला आणि रागावलेल्या पतीने न्यायालयातून बाहेर पडताना पत्नीच्या गळ्यावर कटरने वार करत गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार घडल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पत्नीच्या गळ्यावर पतीने कटरने वार केल्याची घटना जेएमएफसी न्यायालय परिसराच्या स्वच्छता गृहाजवळ घडली असल्याची माहिती मिळाली आहे.  

अधिक वाचा ; देव दिवाळीसाठी 10 लाख दिवे, 50 टन फुलं अशी जय्यत तयारी

परभणीतील न्यायालयाच्या आवारातच ही भयंकर घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ

परभणीतील न्यायालयाच्या आवारातच ही भयंकर घटना घडल्यामुळे परिसरात गोंधळ तसेच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटस्फोटाच्या सुनावणीसाठी कोर्टाच्या परिसरातच पतीने पत्नीच्या गळ्यावर कटरने वार केल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी वैष्णवीची प्रकृतीत सुधारणा होत आहे. वैष्णवीची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी  याप्रकरणी तिचा जबाब नोंदवून आरोपी पती ज्ञानेश्वर खनपटे याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पत्नीने घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान तडजोड न केल्यामुळे संतापलेल्या पतीने हे भयानक कृत्य असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा ; लग्नासाठी मुलगी पहायला जाताना आयशर-कारचा घडला भीषण अपघात 

आरोपी पतीला परभणीच्या नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलं

पत्नी वैष्णवी या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी परभणीच्या न्यायालयात आल्या असता पतीने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला, आरोपी पतीला परभणीच्या नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, कटरने वार केल्यामुळे जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी परभणीच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून या ठिकाणी महिलेवर उपचार करण्यात आले आहेत.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी