धक्कादायक! या जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 21, 2020 | 15:44 IST

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी देखील मोठ्या प्रमाणात बाधित आढळल्याने मोठा धक्का बसला आहे.

corona positive patient
कोरोना पॉझिटिव्ह   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रविवारी तब्बल १३७ रुग्णांची वाढ झाल्यामुळे औरंगाबादेत तब्बल कोरोनाबाधितांचा आकडा ३४९७ इतका झाला आहे.  
  • बीड शहरात आढळले आठ बाधित रुग्ण 
  • आतापर्यंत तब्बल १८५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले

औरंगाबाद: कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पश्चिम महाराष्ट्रानंतर कोरोनाने आपला शिरकाव हा मराठवाड्यात केला असून,मराठवाड्याची राजधानी औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाने चांगलाच हैदोस घातला आहे. २१ जून रविवारी कोरोना बाधितांचा आकाड्याने आजपर्यंतचा रेकॉर्ड मोडून टाकला आहे. रविवारी तब्बल १३७ रुग्णांची वाढ झाल्यामुळे औरंगाबादेत तब्बल कोरोनाबाधितांचा (Corona Positive) आकडा ३४९७ इतका झाला आहे.  

एवढे बाधित कोरोनामुक्त

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा असून आतापर्यंत तब्बल १८५७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून, घरी गेले आहेत. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या भागातील आढळले नवीन कोरोनाबाधित रुग्ण

तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (२), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (२), छत्रपती नगर, वडगाव (३), राम मंदिराजवळ, बजाज नगर (१), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), पळशी (१०), करमाड (१), पिसादेवी (२), कन्नड (६), गंगापूर (२) हडको (1), एन पाच सिडको (१), कैसर कॉलनी (१), एन दोन, ठाकरे नगर (१), एन दोन सिडको (१), गारखेडा परिसर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (२), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (१), एमजीएम हॉस्पीटल जवळ (१), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (५), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (१)सुदर्शन नगर ,हडको (१), एन पाच सिडको (१), कैसर कॉलनी (१), एन दोन, ठाकरे नगर (१), एन दोन सिडको (१), गारखेडा परिसर (२), जय भवानी चौक, बजाज नगर (२), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (१), एमजीएम हॉस्पीटल जवळ (१), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (५), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (१),वाळूज पंढरपूर (१), क्रांती नगर (१), मिल कॉर्नर (१), बनेवाडी (१), एन नऊ, सिडको (२), शिवाजी नगर (४), न्यू विशाल नगर (२), न्यू हनुमान नगर (१),

उस्मानपुरा (७), राजीव नगर (३), अबरार कॉलनी (१), सातारा परिसर (३), जयसिंगपुरा (६), सुरेवाडी (२), एन बारा हडको (१), बायजीपुरा (१), मयूर नगर, एन अकरा (१), अहिनेस नगर (१), जय भवानी नगर (३), मातोश्री नगर (१), न्यू बायजीपुरा (१), एन बारा, हडको (१), गजानन नगर (५), गरिष नगर (१) , नारळीबाग (१), भावसिंगपुरा (१), कोकणवाडी (१), राम नगर (५), लक्ष्मी नगर (१), समर्थ नगर (१), राज नगर, छत्रपती नगर (१), सुभाषचंद्र बोस नगर (१), राजेसंभाजी कॉलनी, हर्सुल (१), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (१), सावित्री नगर, चिकलठाणा (१), गादिया विहार, शंभू नगर (१), एसटी कॉलनी, एन दोन (१), एन अकरा, नवनाथ नगर (३), एन अकरा दीप नगर (४), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (३), हनुमान चौक, चिकलठाणा (२), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), विष्णू नगर (१), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (१), उल्कानगरी (१), नागेश्वरवाडी(१) या भागातील कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

बीड शहरात आढळले आठ बाधित रुग्ण 

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्याला देखील चांगलाच धका बसला आहे. बीड शहरात एकूण ८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरातील शहेनशहा नगर भागातील १, झमझम कॉलनी भागातील २, बशिरगंज भागातील १, तर धारूर तालुक्यातील चिंचपूर येथील औरांगाबाद येथून आलेल्या एका ३१ वर्षीय महिलेला देखील कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. अचानक वाढलेल्या बाधितांमुळे बीड शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी