Dasara Melava दसरा मेळावा जंगी करण्यासाठी उस्मानाबाद शिवसेनेने रेल्वेचं केली बुक, तब्बल 'एवढे' शिवसैनिक पोहोचणार दसरा मेळाव्यासाठी मुंबईला

The MLA booked a train to go to the Dussehra gathering : उस्मानाबादमधून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक रेल्वेतून  जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद – कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. 

The MLA booked a train to go to the Dussehra gathering
दसरा मेळावा जंगी करण्यासाठी आमदाराने रेल्वे केली बुक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दसरा मेळावा जंगी व्हावा यासाठी दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरु
  • कैलास पाटील यांनी दसरा मेळावा जोरदार व्हावा यासाठी जंगी तयारी करण्यास सुरुवात केली
  • जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये दसरा मेळाव्यासाठी मोठा उत्साह – आमदार कैलास पाटील

उस्मानाबाद : शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा येत्या 5 तारखेला आहे. आपला दसरा मेळावा जंगी व्हावा यासाठी दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरु आहे. उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी दसरा मेळावा जोरदार व्हावा यासाठी जंगी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातून थेट दादरपर्यंत रेल्वे बुक केली आहे.  उस्मानाबादमधून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक  रेल्वेतून  जाणार असल्याची माहिती उस्मानाबाद – कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील यांनी दिली आहे. 

अधिक वाचा : डान्स गरबा आहे  भन्नाट,वजन कमी करण्यासह होतात हे फायदे

जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये दसरा मेळाव्यासाठी मोठा उत्साह – आमदार कैलास पाटील

शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे की, येत्या 5 ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे शिवतीर्थावर्ती शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्याला घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. दसरा मेळाव्याला येण्याची अनेक शिवसैनिकांची इच्छा आहे. यासाठी जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याचबरोबर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने विशेष रेल्वे आयोजित करण्यात आली आहे. सदर विशेष रेल्वे ही उस्मानाबाद स्थानकावरून उद्या रात्री निघणार असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा ; शिंदे गटाच्या आमदाराने भाजपच्या मेळाव्यात भाजपचा गमछा घातला 

तुळजाभवानी एक्स्प्रेस नावाने विशेष रेल्वे करण्यात आली आयोजित

दरम्यान, कैलास पाटील म्हणाले, आयोजित करण्यात आलेल्या विशेष रेल्वेचे नाव तुळजाभवानी एक्स्प्रेस असं ठेवण्यात आले आहे. याचं तुळजाभवानी एक्स्प्रेसमधून तब्बल अडीच ते तीन हजार शिवसैनिक प्रवास करत दसरा मेळाव्यासाठी पोहोचणार असल्याचं देखील पाटील म्हणाले. रात्री 2 वाजता तुळजाभवानी एक्स्प्रेस उस्मानाबाद रेल्वे स्टेशनमधून निघणार आहे. तसेच बरेच शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी आपल्या खासगी वाहनातून देखील पोहोचतील असंही पाटील म्हणाले.

अधिक वाचा ; शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतरची विधानसभेची पहिली पोटनिवडणूक

रेल्वेला असणार २४ डब्बे

तुळजाभवानी एक्स्प्रेसला तब्बल २४ डब्बे असणार आहेत. यातून तब्बल अडीच ते तीन हजार शिवसैनिक प्रवास करतील असं आमदार कैलास पाटील म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी