राज ठाकरेंच्या सभेला पोलिसाकडून अद्याप परवानगी नाही, मनसे 'हा' निर्णय घेण्याच्या तयारीत

The MNS meeting in Aurangabad has not yet received permission from the police : मनसे अध्यक्ष राज ठकारे यांची सभा औरंगाबाद येथे होणार असून, मनसेने रितसर पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

The MNS meeting in Aurangabad has not yet received permission from the police
सभेला अद्याप परवानगी नाही,मनसे 'हा'निर्णय घेण्याच्या तयारीत   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मनसेच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला पोलिसांकडून अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आली नाही
  • पोलिसांनी परवानगी न दिल्याने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ - मनसे
  • मनसेने रितसर पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे येत्या १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असून,या सभेची जोरदार तैयारी देखील सुरु झाली आहे. मात्र, मनसेच्या या सभेला पोलिसांकडून अद्याप पर्यंत परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे, मनसे आता आक्रमक होताना दिसत आहे. सभेला अवघे ८ दिवस उरले असताना देखील पोलिसांनी परवानगी न दिल्याने लवकर योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ असा इशारा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. दरम्यान, सभेच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मनसेच्या औरंगाबाद येथे होणाऱ्या सभेला अनेक संघटनांनी विरोध करत पोलिसांना निवेदन देत परवानगी नाकारावी असं म्हटलं आहे.

अधिक वाचा ; भारतीय दांपत्याच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी नागरिकाला फाशी

मनसेने रितसर पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे

मनसे अध्यक्ष राज ठकारे यांची सभा औरंगाबाद येथे होणार असून, मनसेने रितसर पद्धतीने पोलीस आयुक्त कार्यालयात सभेला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. मनसेने दिलेल्या निवेदनानुसार राज ठाकरे यांची सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणाचा आढावा पोलीस आयुक्त, दोन पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षक यांनी घेतला असला तरी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यातचं या ५ संघटनांनी दिलेल्या निवेदनामुळे सभा होणार की, नाही असा प्रश निर्माण होत आहे.

अधिक वाचा ; IPL: CSKच्या खेळाडूची धोकादायक बॉलिंग, तोंडावर पडला इशान 

या संघटनांनी राज ठाकरेंच्या सभेला केला विरोध?

  1. वंचित बहुजन आघाडी
  2. गब्बर ॲक्शन संघटना
  3. मौलांना आझाद  विचार मंच 
  4. प्रहार संघटना
  5. ऑल इंडिया पँथर सेना
  6. या संघटनांनी राज ठाकरे यांच्या सभेला विरोध केला आहे 

राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात

१ मे रोजी औरंगाबाद येथे मनसेने सभा जाहीर केल्यानंतर राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, पोलिसाकडून अद्याप परवानगी न मिळाल्याने सभा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना लवकरच कोरोनाची लस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी