पक्ष गेला उडत, खासदार संभाजीराजेंच भाजपला आव्हान, आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Oct 09, 2020 | 19:41 IST

The party went flying, BJP MP Sambhaji Raje challenged the BJP: आरक्षण हा आमचा हक्क आहे, आम्ही भीक नाही तर आम्ही आमचा हक्क मागतोय. मराठा आरक्षण टिकवण्यात सरकार कमी पडले असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

पक्ष गेला उडत, भाजप खासदार संभाजीराजेंच भाजपला आव्हान
The party went flying, BJP MP Sambhaji Raje challenged the BJP  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका
  • भाजपकडून मी राज्यसभेवर खासदार असलो तरी माझी नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केलेली आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठली पाहिजे ही आमची मागणी

उस्मानाबाद: ज्यांना आंबेडकर कळलेच नाहीत तेच मराठा आरक्षणाला (maratha ) कोर्टात जाऊन विरोध करतात अशी टीका छत्रपती संभाजीराजे (sambhaji raje ) यांनी गुणरत्न सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांचे नाव न घेता केली असून, आमचा संयम तोडायला लावू नका अन्यथा आम्ही तलवारी सुधा हातात घेऊ असा इशारा देखील छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजापूर (tuljapur) येथील मराठा क्रांती ठोक मोर्चा (maratha kranti thok morcha) प्रसंगी दिला आहे. आज तुळजाभवनीच्या मंदिरासमोर जागरण गोंधळ घालून मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात करण्यात आली.

भाजपकडून मी राज्यसभेवर खासदार असलो तरी माझी नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केलेली आहे.

भाजपकडून मी राज्यसभेवर खासदार असलो तरी माझी नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केलेली आहे, त्यामुळे पक्ष गेला उडत, वेळ पडली तर मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी आम्ही दिल्लीत धडकायला देखील घाबरणार नाही. दरम्यान पुढे बोलताना संभाजी राजे म्हणाले, राज्यातील मराठा आरक्षणासाठीची आंदोलनं ही भाजप पुरस्कृत असल्याचा देखील आरोप आमच्यावर केला जातोय.

राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण हा आमचा हक्क आहे, आम्ही भीक नाही तर आम्ही आमचा हक्क मागतोय असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. मराठा आरक्षण टिकवण्यात सरकारचे प्रयत्न कमी पडले असून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीकाही संभाजीराजे यांनी केली आहे. कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका, वेळ आली तर हातात तलवार देखील घेईन, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसह समाजाच्या इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या तिसऱ्या पर्वाला आज तुळजापूरातून सुरूवात झाली. यावेळी संभाजीराजे छत्रपती उपस्थित होते. तुळजा भवानी मंदिराच्या मुख्यद्वारासमोर जागरण, गोंधळ घालून या आंदोलनाला सुरूवात झाली.

सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठली पाहिजे 

कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांची भेट झाली तेव्हा समाज तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे मी त्यांना सांगून आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, त्यावर असलेली सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठली पाहिजे ही आमची मागणी आहे. राज्य सरकारने त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आरक्षणाच्या या लढ्यात समाजाला ताकद देण्यासाठी तुळजा भवानीचा आशिर्वाद मागायला आलोय असेही संभाजीराजे यांनी सांगतिले.

मी २००७ मध्येच राजवाडा सोडला आहे

ओबीसी समाजातून तर आम्हाला आरक्षण मुळीच नको, ही आमची ठाम भूमिका आहे. पण काहीजण ओबसी आणि मराठा समाजात गैरसमज पसरवून दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाने कधीही कुणाच्या हक्कावर गदा आणून आरक्षण मागितलेले नाही. दरम्यान पुढे बोलताना संभाजी राजे म्हणाले, मला मराठा आरक्षणाशी काही देणंघेणं नाही मी राजवाड्यातच बसून असतो अशी टीकाही माझ्यावर केली जातेय पण मी २००७ मध्येच राजवाडा सोडला आहे, समाजासोबत बसणे हाच माझा राजवाडा असल्याचेही संभाजीराजे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी