पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाचे पोलिसांनी जीवाची पर्वा न करता वाचवले प्राण, पहा घटनेचा थरारक व्हिडीओ

The police saved the life of the youth regardless of his life : ओढ्यात एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आले, पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला जीवदान दिले आहे.

The police saved the life of the youth regardless of his life
पोलिसांनी जीवाची पर्वा न करता तरुणाचे पोलिसांनी वाचवले प्राण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ओढ्यात एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आले
  • पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला जीवदान दिले
  • शेकडो नागरिक ही घटना मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करत होते

पुणे : गेल्या काही दिवसात होणाऱ्या सततच्या पावसामुळे ओढे तसेच नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आणि याचं ओढ्यात एक व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आले, पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला जीवदान दिले आहे. सदर व्यक्ती याने आत्महत्या करण्यासाठी ओढ्यात उडी मारली होती. मात्र, तिथे गस्तीवर असलेल्या शिपाई सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांनी वाचवले आहे.

अधिक वाचा ; अवघ्या 5 दिवसांत मुंबईत ४३ टक्के पाऊस, मुसळधार पावसाचा इशारा

अशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती ओढ्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या सद्दाम शेख आणि अजित पोकरे यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच दोघांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी, सद्दाम शेख यांनी ओढ्यात असलेल्या तरुणाला पाण्यात उतरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या तरुणाने सद्दाम यांना न जुमानता धक्का देऊन पाण्यात उडी मारली पाठोपाठ सद्दाम यांनीदेखील ओढ्यामध्ये उडी मारली. शेख यांनी जीवाची पर्वा न करता त्या तरुणाला ओढ्याच्या कडेला ओढत आणले आणि त्याचे प्राण वाचवले. सदर ओढा हा जवळपास १० फूट खोल असल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेख यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता एका व्यक्तीचा प्राण वाचवला आहे. दरम्यान, सदर घटना घडत असताना परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती, सद्दाम शेख यांच्या कामगिरीचे सर्वांनी कौतुक केले आणि सुटकेचा निश्वास टाकला. एखादी नाट्यमय घटना घडावी त्याप्रमाणे बागुल उद्यान जवळील ओढा परिसरात घडली आहे.

अधिक वाचा ; मुख्यमंत्री आता 'या' परवानगी नंतरच विठूरायाची पूजा करू शकणार 

शेकडो नागरिक ही घटना मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करत होते

दरम्यान, ज्यावेळी पोलीस शिपाई शेख आणि पोकरे घटनास्थळी पोहोचले तेव्हा तो तरुण ओढ्यामध्ये उभा असल्याचे दिसला त्याला पाण्याच्या बाहेर येण्यास सांगितले परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष करून अजून मधोमध जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अखेर पोकरे यांनी दोरी धरून शेख ओढ्यात उतरले आणि त्यांनी तरुणाला बाहेर आणण्याचा प्रयत्न केला परंतू त्या तरुणाने शेख ह्यांच्या हाताला हिसका देत पाण्यात उडी मारली आणि पाण्याच्या वेगामुळे तो वाहू लागला. दरम्यान, शेख आणि पोकरे या दोघांनी देखील त्याला पूर्ण ताकत लावून ओढले आणि त्याला बाहेर काढले. ही घटना घडत असताना परिसरातील शेकडो नागरिक ही घटना मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद करत होते. 

अधिक वाचा : भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटींच्या घरात

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी