औरंगाबाद : शिवसेनेचे नेते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करत त्यांना अटक केली आहे. राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी ईडीवर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय यंत्रणा पाठीमागे लावून त्रास देण्यात येत असल्याचं देखील बोललं जाऊ लागलं आहे. भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा वापर करत विरोधकांना आपल्या पक्षात आणण्यासाठी 'ईडी'चा वापर केला जात असल्याचा देखील आरोप काही नेत्यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे एका तरुणाने शहरात भन्नाट होर्डिंग लावले आहे. भाजपमध्ये गेल्यावर 'ईडी'ची कारवाई झाल्याचं दाखवा आणि लाख मिळावा असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला आहे. सदर तरुण हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे. या पदाधिकाऱ्याने लावलेल्या पोस्टरची चर्चा राज्यभरात सुरू आहे.
अधिक वाचा ; शेवटच्या षटकातील दोन चेंडूंतच वेस्ट इंडिजनं मिळवला विजय
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील यांनी औरंगाबाद शहरात ईडी करत असलेल्या कारवाईबाबत अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये लाख रुपयाच्या बक्षीसाची घोषणा देखील करण्यात आली आहे. मात्र, हे लाख रुपये मिळवणे लोकांना अवघड आहे. कारण, अक्षय पाटील यांनी बॅनरमध्ये दिलेला प्रश्न अवघड आहे. पाटील यांनी भाजप गेलेल्या नेत्यांची कारवाई चालूच असल्याची पुढे दाखवा असं पाटील यांनी प्रश्न विचारला आहे.
अधिक वाचा ; Video: भयंकर... १५ वर्षीय मुलीने बहिणीची तलवारीने मानच उडवली
दरम्यान, अक्षय पाटील यांनी शहरात अनेक ठिकाणी एक प्रश्न विचारणारे बॅनर लावले आहेत. पाटील यांनी लावलेल्या बॅनरवर, 'भाजप नेत्यावर ईडी, सीबीआय, आयकर कारवाई झाल्याचे आणि भाजपात गेल्यावर कारवाई पुढे चालूच राहिल्याचे कळवा व लाख रुपये मिळवा असं म्हटलं आहे. अक्षय पाटील यांनी लावलेल्या या बॅनरची चर्चा औरंगाबाद येथेच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात सुरू आहे. त्याचबरोबर हे बॅनर कालपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.