संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात मंत्रिपदासाठी शर्यत, खैरैनी केली टीका

बंडखोर आमदार जरी औरंगाबादवरून जाऊन मुंबईत शक्तिप्रदर्शन करत असले तरी त्यांच्यामध्येच आपापसात भांडणं होतील आणि त्यांच्यातच लढाया होतील.

The race for the ministerial post between Sanjay Shirsat and Abdul Sattar, Khairani criticized
संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात मंत्रिपदासाठी शर्यत  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • बंडखोर आमदार जरी औरंगाबादवरून जाऊन मुंबईत शक्तिप्रदर्शन करत असले तरी त्यांच्यामध्येच आपापसात भांडणं होतील आणि त्यांच्यातच लढाया होतील.
  • संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या दोघांनाही मंत्रीपद मिळणार नाही.
  • यानंतर शिवसेना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, जशास तसे उत्तर देऊ.

औरंगाबाद :  बंडखोर आमदार जरी औरंगाबादवरून जाऊन मुंबईत शक्तिप्रदर्शन करत असले तरी त्यांच्यामध्येच आपापसात भांडणं होतील आणि त्यांच्यातच लढाया होतील. संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार या दोघांनाही मंत्रीपद मिळणार नाही. यानंतर शिवसेना आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, जशास तसे उत्तर देऊ. आज गुरुवार 14 जुलै रोजी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदासाठी चढाओढ लागल्याचे दृश्य जिल्ह्यात दिसत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेना बंडखोरांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता खूप कमी असून भाजपाला सर्वात जास्त मंत्रीपद जाणार आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळणार नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आमची ताकद मोठी हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही आमदार करत आहेत. मंत्रिपदासाठी आता आमदार संजय शिरसाठ आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यामध्ये शर्यत लागली असून मुंबईत कोणाचे वजन मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही आमदार करत असल्याची टीका आज शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी