एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील होण्याचं कारण तेरा वर्ष जुनं, प्रदीप जैस्वालांनी मांडली भूमिका

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Jul 06, 2022 | 12:15 IST

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) जाऊन नवीन शिंदे सरकार आलं. सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक आमदार आप-आपल्या मतदारसंघात आपल्या घरी पोहोचले आहेत. तेथे गेल्यानंतर आमदार नव-नवीन खुलासे करत आहेत. बंड का झालं कसं झालं कोणामुळे झालं याची कारणे सर्व आमदार आपल्या मतदारसंघातील लोकांना देत आहेत.

The reason for joining Shinde's rebellion is thirteen year old Jaiswal
शिंदेंच्या बंडात सामील होण्याचं कारण तेरा वर्ष जुनं-जैस्वाल  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • निराला बाजार येथील जैस्वाल यांच्या निवासस्थानाला ४२ पोलिसांचा वेढा आहे.
  • जैस्वाल यांची ओळख औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील शिवसेनेतील सर्वात लोकप्रिय, प्रभावी नेता म्हणून

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Sarkar) जाऊन नवीन शिंदे सरकार आलं. सरकार स्थापन झाल्यानंतर प्रत्येक आमदार आप-आपल्या मतदारसंघात आपल्या घरी पोहोचले आहेत. तेथे गेल्यानंतर आमदार नव-नवीन खुलासे करत आहेत. बंड का झालं कसं झालं कोणामुळे झालं याची कारणे सर्व आमदार आपल्या मतदारसंघातील लोकांना देत आहेत. याच दरम्यान औरंगाबदेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी बंड करण्याविषयी मोठा खुलासा केला आहे. ते एका मराठी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत जैस्वाल बोलत होते. 

बंडाविषयी बोलताना जैस्वाल म्हणाले की, राज्यसभा, विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडाचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. पण ती वस्तुस्थिती नाही. मे महिन्यातच उठावाची तयारी सुरू झाली होती, असे शिंदे गटातील आमदार प्रदीप जैस्वाल यांनी स्पष्ट केलं. १६ दिवसांत मुंबई, सुरत, गुवाहाटी, गोवा, मुंबई असा प्रवास करत काल ५ जुलै रोजी पहाटे जैस्वाल शहरात परतले.

दरम्यान, जैस्वाल यांची ओळख औरंगाबाद शहर, जिल्ह्यातील शिवसेनेतील सर्वात लोकप्रिय, प्रभावी नेता म्हणून आहे. बंडानंतर त्यांच्या निराला बाजार येथील निवासस्थानाला ४२ पोलिसांचा वेढा आहे. बंड का झाले कधी झाले याविषयी बोलताना जैस्वाल पुढे म्हणाले की, मुळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची कुणाचीही इच्छा नव्हती. कारण भाजपसोबत युतीमध्येच मते मिळाली आहेत, हे सर्वांना पक्के ठाऊक होते. काही महिन्यांपूर्वी विभागीय आयुक्तालयात अजित पवारांनी पुलांच्या निधीची आठवण आहे, असे म्हटले. पण निधी दिलाच नाही.

Read Also : काय महागाई...काय दरवाढ...काय तो सिलेंडर महागला, नॉट ओके...

आपण २००९ मध्ये अपक्ष आमदार असताना खूप पाठपुरावा करूनही मकाई गेट, बारापुल्ला, मेहमूद दरवाजा पुलांसाठी ११ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला नव्हता. महाविकास आघाडी सरकारमध्ये मागणी मंजूर होणे तर सोडाच, वरिष्ठ स्तरावरून काही प्रतिसादही मिळत नसल्यानं अखेरचा पर्याय म्हणून बंडात सहभागी झाल्याचं ते म्हणाले. 

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मोर्चेबांधणी मे महिन्यात

वरिष्ठांशी संपर्कच होत नसल्याने आम्ही आमच्या अडचणी एकनाथ शिंदेंना सांगत होतो. त्यांनी नगरविकास खात्यातून मला रस्त्यांसाठी निधी दिला. त्यावेळी त्यांच्याशी अधिक घनिष्ठ संपर्क झाला. खरे तर आमची व्यथा शिंदेंनी पाच वेळा उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली. पण त्यातून ठोस काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे विधान परिषदेचे मतदान झाले की महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मोर्चेबांधणी मे महिन्यातच सुरू झाली.

Read Also : CM शिंदे विधानसभेत भावूक झाले, राऊत म्हणाले आव आणला!

नुकसान होणार हे दिसत होते

जैस्वाल म्हणाले की,  काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विरोधातील शिवसेनाच लोकांना आवडते. तरीही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने पुढे शिवसेनेचे प्रचंड नुकसान होईल, हे तर आम्हाला स्पष्ट दिसत होते. त्यात अडीच वर्षांत राष्ट्रवादीला रसद सुरू होती. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत एक-दोन नव्हे, पन्नास आमदार उभे ठाकले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी