मोठी बातमी : कृषिमंत्री दादा भूसेंचे भाषण सुरु असताना कोसळला मंडप

The shocking incident happened during Dada bhuse's speech ; राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे आज हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आले असून, ते महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधत होते. यादरम्यान, अचानकपणे हवा सुरु झाली आणि मोठ्या प्रमाणात हवेचा झोक आल्याने स्टेजच्या डाव्या बाजूकडील मंडप कोसळला.

The shocking incident happened during Dada Bhuse's speech
कृषिमंत्री दादा भूसेंचे भाषण सुरु असताना कोसळला मंडप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दादा भूसेंचे भाषण सुरु असतानाच मंडप कोसळला
  • मंडप कोसळताच सभेत गदारोळ उडाला होता.
  • सुदैवाने त्या मंडपाखाली कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

हिंगोली : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधत असताना अचानकपणे मोठ्या प्रमाणात हवा आली आणि डाव्या बाजूचा मंडप कोसळल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र. सुदैवाने त्या मंडपाखाली कोणीही नागरिक नसल्याने मोठा अनर्थ टळला. मंडप कोसळताच सभेत गदारोळ उडाला होता. परंतू कृषीमंत्र्यांनी आवाहन केल्याने नागरिकांनी गदारोळ थांबवला. सदर घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमात घडली आहे. सदर कार्यक्रमात दादा भुसे यांनी औंढा शहरालगत असलेल्या जिंतूर पॉईंटवर विकेल ते पिकेल या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अधिक  वाचा ; ऑस्ट्रेलियाएवढ्या लोकसंख्येचे भारतात एका दिवसांत लसीकरण

नेमकी काय घडली घटना?

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे हे आज हिंगोली जिल्हाच्या दौऱ्यावर आले असून, ते महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी महिलांशी संवाद साधत होते. यादरम्यान, अचानकपणे हवा सुरु झाली आणि मोठ्या प्रमाणात हवेचा झोक आल्याने स्टेजच्या डाव्या बाजूकडील मंडप कोसळला. मंडप कोसळताच कार्यकर्त्यांची धावपळ सुरु झाली. सुदैवाने या मंडपात एकही व्यक्ती नसल्याने कोणालाही इजा किंवा दुखापत झाली नाही.

अधिक  वाचा ; सलग चौथ्या दिवशी सोन्याची झळाली घटली, सोने खरेदी करावे का?

हवा निघून गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका – कृषिमंत्री दादा भुसे

दरम्यान, डाव्या बाजूकडील मंडप कोसळताच नागरिक आणि महिला चांगल्याच घाबरल्या होत्या, या महिलांना धीर देण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी हवा निघून गेली आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं आणि सर्वजण शांत झाले. मात्र, हवा मोठ्या प्रमाणात असल्याने ज्या मंडपात कार्यक्रम सुरु होता तो मंडप सुद्धा कोसळतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु स्टेजच्या डाव्या बाजूला कोसळलेल्या मंडपात जर नागरिक बसलेले असते तर मोठा अनर्थ झाला असता हे ही तितकेच खरे.

अधिक  वाचा ; महाविकास आघाडीच्या पोलीस बढती बदली आदेशाला स्थगिती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी