रुग्णाच्या मृत्युनंतर संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या, रुग्णालयावर केले गंभीर आरोप

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 01, 2020 | 10:51 IST

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीला दाखल करून घेतले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबातील व्यक्तींनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत.

The shocking type happened again in the hospital
रुग्णाच्या मृत्युनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी मांडला ठिया, रुग्णालयावरती गंभीर आरोप   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • यापूर्वी रुग्णालयात घडला होता धक्कादायक प्रकार?
  • रुग्णाच्या मृत्युनंतर काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण
  • जिल्हा शल्यचिकित्सकांनी आरोप फेटाळले

उस्मानाबाद: देशासह राज्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कोरोनाने (corona) मराठवाड्यातील (marathwada) अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यात (Osmanabad District) एका व्यक्तीचा दिवसापूर्वी ऑक्सिजन अभावी मृत्यू (Corona Death) झाला होता. असा आरोप त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीने केला होता. ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला होता. सदर घटनेची दखल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (minister rajesh tope) यांनी घेऊन सदर घटनेचे चौकशीचे आदेश दिले होते. मात्र पुन्हा काहीसा असाच प्रकार जिल्हा रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाच्या वार्डात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींनी केला आहे.

नेमक काय आहे प्रकरण?

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एका व्यक्तीला दाखल करून घेतले होते. मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर व्यक्तीचा मृत्यू डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे व योग्य उपचार न दिल्यामुळे झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी केला आहे. रुग्णाच्या मृत्युनंतर काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर हा तणाव निवळला आहे.

यापूर्वी रुग्णालयात घडला होता धक्कादायक प्रकार?

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात काही दिवसापूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. परांडा येथील एक व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असताना रात्रीच्या दरम्यान ऑक्सिजन बंद करतात. तसेच डॉक्टर देखील उपस्थित नसतात असा गंभीर आरोप या व्यक्तीने केला होता. सदर व्यक्तीने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला होता. व्हिडिओ व्हायरल होताच चांगलीच खळबळ उडाली होती.

मृत्युपूर्वी काय म्हणाला रुग्ण?

या कथित व्हिडिओमध्ये रुग्णाने गंभीर आरोप केले होते. मृत्युपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये रुग्ण सांगत आहे की, मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आसू गावचा रहिवासी असून, मी कुठेही गेलेलो नाही. तरीदेखील मला कोरोनाची लागण झाली असून, मी उस्मानाबाद येथे कोविड १९ वर उपचार घेत आहे. तरी माझे हातपाय गळाटून दम भरत आहे. इथ डॉक्टर इलाज करतात मात्र थोडा उशीर लागत आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांनी आरोप फेटाळले

या सर्व घटनेवर आमचे प्रतिनिधी अजहर शेख यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोनद्वारे संपर्क साधला असता, त्यांनी कथित व्हिडिओमध्ये एका रुग्णाने मृत्युपूर्वी केलेले सर्व आरोप हे चुकीचे असल्याचे सांगितले होते. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणाले की, आपल्याकडे सर्व सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, ऑक्सिजन बंद करण्याचा प्रश्नच येत नाही.

पुन्हा घडला प्रकार?

दरम्यान उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्नालयात डॉक्टर नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

नातेवाईकांनी मांडला होता ठिय्या

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयाच्या समोर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी ठिया मांडला होता. तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासंनाच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी