शरद पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या 'या' आमदाराची जीभ घसरली!

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jul 13, 2020 | 18:22 IST

The tongue slipped of a former NCP MLA rahul mote : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या विषयी बोलताना भूम परंडा वाशी मतदारसंघातचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटेंची जीभ घसरली

The tongue slipped of a former NCP MLA rahul mote
शरद पवारांचे निकटवर्तीय असणाऱ्या 'या' आमदाराची जीभ घसरली!  |  फोटो सौजन्य: AP, File Image

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटेंची जीभ घसरली
  • सुजीतसिंह ठाकूर यांच्यावर टीका करताना घसरली जीभ
  • ठाकूर यांनीही केली होती शरद पवारांवर टीका

उस्मानाबाद:  भारतीय जनता पार्टीचे (bjp) विधान परिषदेचे (vidhan parishad)  आमदार गोपीचंद पडळकर (gopichand) यांनी पंढरपूर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्यावर जहरी टीका केली होती. दरम्यान, पडळकर यांच्या टीकेनंतर गोपीचंद पडळकर यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात पडळकर यांचा निषेध केले गेला होता. दरम्यान गोंधळ आणि थांबला नाही तीच पुन्हा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर (sujitsinh thakur) यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका करत चांगलाच टोला मारला आहे. ठाकूर यांनी केलेल्या टीकेनंतर माजी आमदार राहुल मोटे यांनी देखील सुजितसिंह ठाकूर यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र सुजितसिंह यांच्यावर निशाना साधत असताना राष्ट्रवादीच्या माजी आमदार राहुल मोटे (rahul mote) जीभ घसरली आहे.

काय म्हणाले आहेत राहुल मोटे?

राहुल मोटे यांचा एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राहुल मोटे म्हणाले आहेत कि, शरद पवार यांच्यावर सुजित ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. आजकाल लायकी नसताना देखील पवार यांच्यावर टीका करण्याची फॅशन झाली आहे. आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी लोकांमधून एकही निवडणूक लढवली नाही.

ठाकूर मागच्या दाराने आमदार झाले आहेत- राहुल मोटे

दरम्यान राहुल मोटे यांनी ठाकूर हे मागच्या दाराने आमदार झाले आहेत. अस देखील म्हंटल आहे. त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्ह्यात पक्षवाढीची जबाबदारी होती. गल्ली ते दिल्ली सत्ता असताना फक्त परंडा मतदार संघात नगरसेवक आणि एक जिल्हा परिषद एवढच ते निवडून आणू शकले. ‘एवढीच त्यांची कुवत आहे.’ अशानी पवारांवर टीका करू नये. अस माजी आमदार राहुल मोटे म्हणाले.

ठाकूर यांनी काय केली होती टीका?

आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांच्या ट्विटरवरती एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, सध्या एक शरद, बाकी गारद! या मुलाखतीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पार्टीची अधिक काळजी करण्यापेक्षा त्यांना भारतीय जनता पार्टीची आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाची अधिक काळजी आहे. असं दिसून येत आहे. त्याचबरोबर शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत किवा इतर कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, हा देखील प्रश्न त्यातून निर्माण होत आहे.

राष्ट्रवादीने शंभरी पार केली नाही- ठाकूर

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकदा नव्हे तर दोनदा शंभराहून अधिक आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष प्रामाणिक आणि पारदर्शी कारभार करून, महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला होता. म्हणून महाराष्ट्रातील जनतेने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जनादेश दिला होता. मात्र जनादेशाचा अनादर करून, महाराष्ट्रात अनैसर्गिक सरकार जन्माला घातलं आहे.ज्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढल्या ते सोबत आले हा देखील जनादेशाचा अपमान आहे असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी