ट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Sep 25, 2020 | 21:43 IST

The truck passed by the body of the assistant:  उस्मानाबाद शहरातील समता नगर येथे राहणाऱ्या  दिव्या जगदीश नाईक, यांना वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील मंडळींनी लावला होता.

The truck passed by the body of the assistant
ट्रकमध्ये चढत असताना सहायक पडला खाली आणि चाक.....  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मिनी ट्रकने दिली जोराची धडक, दोघांचा मृत्यू
  • सुनेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील मंडळीवर गुन्हा दाखल
  • मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य आढळल्याने गुन्हा दाखल

उस्मानाबाद, उमरगा: चालक- समद अलिसाब अत्तार, रा. मंठाका, ता. बसवकल्याण (basavakalyan) याने ट्रक निष्काळजीपणे चालवल्याने ट्रकमध्ये (truck) चढत असणाऱ्या सहायक-विराण्णा विठ्ठल जवळगे, वय ३१ वर्षे हा खाली पडून त्यांच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना दि. २४ सप्टेंबर रोजी ६ वाजण्याच्या सुमारास बायपास रोड, उमरगा येथे घडली आहे. सदर घटनेची फिर्याद संतोष विठ्ठल जवळगे (मयताचा भाऊ) यांनी दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून  भा.दं.सं. कलम- २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. (truck clinner accident)

मिनी ट्रकने दिली जोराची धडक, दोघांचा मृत्यू

दत्ता आबाचने या चालकाने मिनी ट्रक दि. २१ सप्टेंबर रोजी उमरगा- लातूर रस्त्यावरील माळज फाटा येथे निष्काळजीपणे चालवत होता. त्यादरम्यान समोरुन येत असलेल्या मोटर सायकल  एम.एच.२४ एच ९९०४ आणि दुसरी मोटार सायकल क्र. एम.एच. २५ के ७२६६ या दोन मोटारसायकलला जोराची धडक दिली.  या अपघातात एम.एच. २५ के ७२६६ वरील शरद निवृत्ती सुर्यवंशी, वय ३५ वर्षे, शंभु बाबुराव कुलकर्णी, वय ३४ वर्षे, दोघे रा. बाबळसुर, ता. उमरगा हे दोघे गंभीर जखमी होउन मयत झाले तर एम.एच. २४ एच ९९०४ च्या या मोटारसायकलीचा चालक किरकोळ जखमी झाला. विवेकानंद माधवराव साळुंखे, रा. बलदवा नगर, लातुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, दि. २४ सप्टेंबर रोजी भा.दं.सं. कलम- २७९, ३३७, ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सुनेचा छळ, गुन्हा दाखल

 उस्मानाबाद शहरातील समता नगर येथे राहणाऱ्या  दिव्या जगदीश नाईक, यांना वाहन खरेदीसाठी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील मंडळींनी लावला होता. याप्रकरणी दिव्या जगदीश नाईक यांनी   1)जगदीश रंगनाथ नाईक (पती) 2) जनाबाई (सासु) 3) रोहिणी दिपक कुलकर्णी (नणंद), तीघे रा. हैदराबाद 4) प्रणिता रविंद्र सराज (नणंद),  उस्मानाबाद  यांनी संगणमताने दिव्या यांचा लग्नानंतर उस्मानाबाद येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. तसेच दिव्या यांना माहेराहुन स्त्रीधन मिळालेले दागिने त्यांनी काढून घेतली अशी तक्रार दिली असून, दिव्या जगदीश नाईक यांच्या तक्रारीवरून नमूद आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम-498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दि. २४ सप्टेंबर  रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार विरोधी कारवाई 

 जावेद इब्राहीम अत्तार व सोमनाथ चपने, दोघे रा. उस्मानाबाद हे दि. २४ सप्टेंबर  रोजी उस्मानाबाद शहरातील ‘अरनुमन पानटपरी’ समोरील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य आणि  रोख रक्कम तीन हजार ६४० रुपये  बाळगले असतांना पोलीस ठाणे  उस्मानाबाद  यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी