Horror in Aurangabad : कोरोनामुळे पतीचा मृत्यू, पत्नीने दोन जुळ्या मुलासह कापली हाताची नस

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 06, 2020 | 12:37 IST

Horror in Aurangabad :महिलेच्या पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर आता आपला आधार संपला असून, आता आपले कसे होणार?या  विवंचनेतून आपल्या दोन जुळ्या मुलांसह पत्नीने आत्महत्या

The wife cut the vein with the child
कोरोनामुळे पतीचा मृत्यू, पत्नीने मुलासह कापली हाताच नस  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोनामुळे झाला होता पतीचा मृत्यू
  • सुसाईड नोट लिहून पत्नीसह जुळ्या मुलांनी उचलले टोकाचे पाऊल
  • आत्महत्ये अगोदर महिलेने मागितली नातेवाईकांची माफी

औरंगाबाद: देशासह राज्यात कोरोनाची (corona) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई पुणे (pune mumbai corona) नंतर मराठवाड्यात (marathawada) देखील कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबादेत देखील कोरोनाने (aurangabad corona) चांगलाच कहर केला आहे. दरम्यान औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजाराच्या वर गेली आहे. त्यामुळे औरंगाबादेत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच औरंगाबादेत एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीच्या मृत्युनंतर पत्नीला दुख सहन न झाल्याने पत्नीने आपल्या दोन जुळ्या मुलांसह आयुष्य संपवलं असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (husbund  death wife suicide)

कोरोनामुळे झाला होता पतीचा मृत्यू

या महिलेच्या पतीचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. पतीचा मृत्यू झाल्यानंतर आता आपला आधार संपला असून, आता आपले कसे होणार? या  विवंचनेतून आपल्या दोन जुळ्या मुलांसह पत्नीने आत्महत्या केली आहे. धारदार शस्त्राने हाताची नस कापत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र महिलेचा आणि मुलीचा मृत्यू झाला असून  मुलगा वाचला आहे. सध्या मुलावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सुसाईड नोट लिहून उचलले टोकाचे पाऊल

पतीच्या मृत्यूचा धक्का पत्नी पचवू शकली नाही. त्यामुळेच आत्म्हत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. पतीच्या मृत्यूनंतर महिलेने टोकाचे पाऊल उचलू नये यासठी त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी राहत होते. मात्र रात्री जेवण झाल्यानंतर एक सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट लिहिल्यानंतर त्यांनी आपल्या हाताची नस कापून आत्महत्या केली. हाताची नस कापण्या आधी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. मात्र त्यांनी गळफास न घेता हाताची नस कापून आत्महत्या केली आहे.

आत्महत्येपूर्वी  महिलेने मागितली नातेवाईकांची माफी

या महिलेने आत्म्हत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये सर्व नातेवाईकांची माफी मागितली आहे. आत्महत्या केलेल्या घराच दार लवकर उघडल जात नव्हत, शेजारील लोकांनी आणि नातेवाईकांनी घराच दार तोडल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन जुळे मुल आणि महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळून आले. दरम्यान नातेवाईकांनी तिघांनाही जवळच्या रुग्णालयात तातडीने हलविले, मात्र महिला आणि मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत मुलाचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

औरंगाबाद कोरोना स्थिती 

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान आज आलेल्या आकडेवारी नुसार ४९ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १५ हजाराच्या वर गेली आहे. दरम्यान ११ हजार ५२१ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ हजार ५१६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी