उस्मानाबाद : महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडवणारी घटना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याचं उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) शासकीय महिला रुग्णालयात घडली आहे. शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसुती चक्क स्वच्छतागृहातच झाली आहे. सदर घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा ही कशा पद्धतीने काम करत आहे याची प्रचीती जिल्हा वासियांना आली आहे. महिलेने चक्क स्वच्छतागृहातच बाळाला जन्म दिल्याने महिलेच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट लाट उसळली असल्याचे पहायला मिळाले.
अधिक वाचा ; "गाडीची टँक फुल केल्यास धावणार 650 KM"गडकरींची भन्नाट कल्पना
उस्मानाबाद येथील महिला शासकीय रुग्णालयात संपूर्ण जिल्हाभरातून महिला प्रस्तुतीसाठी येत असतात. मात्र, या रुग्णालयात सतत स्वच्छतेचा अभाव असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, आज रुग्णालयात एक धक्कादायक घटना पहायला मिळाली आहे. प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची चक्क स्वच्छतागृहातच पमहिलेने आपल्या बाळाला जन्म दिला आहे. रुक्मिणी असं प्रसुती झालेल्या महिलेचं नाव आहे. रुक्मिणी या तुळजापूर तालुक्यातील मसाला गावातील रहिवाशी असून, त्यांना मंगळवारी रात्रीच्या सुमारास अचानक प्रसुती कळा होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी आणले. मात्र, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना आवश्यक ती सेवा मिळाली नाही. असा आरोप रुग्णालयाच्या नातेवाईकानी केला आहे. दरम्यानं, रुक्मिणी यांना रुग्णालयात असलेल्या दोन परिचारिकांनी परिसरात चकरा मारा असा सल्ला दिला होता.
अधिक वाचा ; मिलिंद सोमणने घेतली पंतप्रधान मोदींची भेट; शेअर केला फोटो
परिचारिकांनी रुक्मिणी यांना चकरा मारा असा सल्ला दिल्यानंतर रुक्मिणी यांनी रुग्णालय परिसरात चकरा मारत असताना त्यांना अचानक त्रास सुरु झाला. त्यानंतर त्या तातडीने रुग्णालयातील स्वच्छतागृहात गेल्या. याचवेळी त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिथेच त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातच महिलांना प्रसूतीसाठी अशा संकटाचा सामना करावा लागत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अधिक वाचा ; फेसबुक गंडलं, युजर्सना टाईमलाईनवर दिसत आहे विचित्र गोष्टी