औरंगाबाद : मुलीसाठी स्थळ हे सरकरी नौकरदार असावा असं प्रत्येक मुलीच्या आई – वडिलांना वाटते. त्यामुळे ज्यांना सरकारी नौकरी नाही अशा मुलांची लग्न होण्यास बेळ लागत असल्याचं आपण समाजात पाहतो. मात्र, सरकारी नौकरी नसल्याने लग्नाला होत असलेला विलंब टाळण्यासाठी एका तरुणाने चांगलीच शक्कल लढवली होती. मात्र, ही शक्कल लढविणे हे त्याच्याच अंगाशी आले असून, त्याला जेलची हवा देखील खावी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
अधिक वाचा ; Watch Video: Liger मधली विजय- अनन्याची केमिस्ट्री बघायचीय?
किराणा दुकान चालावाऱ्या युवकाचे लग्न लवकर जमत नसल्याने त्याने थेट बनाव केला आहे. आपल्याला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले असून, राज्यकर निरीक्षक, राज्यकर उपायुक्त पदावर नियुक्ती होणार असल्याचा बनाव सदर तरुणाने केला. रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे असे या तरुणाचे नाव आहे. चांगली मुलगी आणि लवकर सोयरीक मिळावी म्हणून रामेश्वर पंढरीनाथ लोखंडे याने हा बनाव केला असल्याचे समोर आले आहे. सदर घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. एका अधिकाऱ्याला संशय आला आणि बनाव करणाऱ्या तरुणाचा भांडाफोड झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक वाचा : खांद्यावर अजगर ठेवून खेचत होता माणूस, व्हिडीओ झाला व्हायरल
रामेश्वर लोखंडे या तरुणाने ११ नोव्हेंबरला राज्यकर सहआयुक्ताने प्रसिद्ध केलेल्या निवड यादीत खाडाखोड केली आणि दुसऱ्याचे नाव खोडून स्वतःचे नाव टाकले. आणि आपली निवड झाल्याचा दावा केला. या दाव्यानंतर गावोगावी त्याचे स्वागत करण्यात आले. सोशल मीडियावर रामेश्वरच्या यशोगाथाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते. रामेश्वर लोखंडे हा मुलगा किराणा दुकान चालवत होता. दुकानदारी करत करत तो राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुद्धा करायचा. दरम्यान तो लग्नासाठी सोयरीक शोधत होता. मात्र सोयरीक जमत नव्हती. त्यामुळे रामेश्वरने शक्कल लढवली असल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक वाचा ; सेक्स पॉवर वाढविणारे आणि आरोग्यासाठी संजीवनी असलेले कडधान्य
मिलेलेल्या माहितीनुसार, रामेश्वर लोखंडे हा तरुणाची राज्यकर उपायुक्त पदावर नियुक्ती होणार असल्याचे सर्वाना वाटल्याने लोक त्याचे अनेक ठिकाणी स्वागत करू लागले. त्याच्या स्वागताचे व्हिडीओ क्लिप हे सोशल मिडियावरती सर्वत्र व्हायरल होऊ लागले. सदर व्हायरल क्लिप ही वस्तू कर निरीक्षकांपर्यंत आली आणि त्यांना काही तरी काळ बेर घडतय असा संशय आला. आणि त्यांनी तेट रामेश्वरला विचारपूस केली. यावेळी रामेश्वर खोटं बोलत असल्याच लक्षात आले आणि त्यांनी त्याची कानउघाडणी केली. त्यांच्या याच संभाषणाची क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली आणि रामेश्वरचा भांडाफोड झाला आहे.
रामेश्वर लोखंड या तरुणाने केलेल्या बनावाची माहिती मिळताच राज्य लोकसेवा आयोगाने त्याला नोटीस पाठवत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर जालना जिल्ह्याचे राज्यकर निरीक्षक गणेश संगम यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार रामेश्वरच्या विरोधात भोकरदन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.