तरुणाने स्वतःला पेटवून घेत तरुणीलाही मारली मिठी

The young man set himself on fire and hugged the young woman : तिने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. अशी तक्रार पोलीसात देऊन एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते.

The young man set himself on fire and hugged the young woman
तरुणाने स्वतःला पेटवून घेत तरुणीलाही मारली मिठी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर आपल्या प्रेयसीला देखील मिठी मारली
  • तरुणाचा मृत्यू तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे
  • मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. पण तिने ते ओळखलं नाही - गजानन

औरंगाबाद : तिने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. अशी तक्रार पोलीसात देऊन एका तरुणाने स्वतःला पेटवून घेतले होते. तरुणाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर आपल्या प्रेयसीला देखील मिठी मारली असल्याने ती देखील यामध्ये गंभीर जळाली असल्याची घटना औरंगाबाद येथे घडली होती. दरम्यान, या घटनेतील तरुणाचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला आहे. तर प्रेयसी मृत्यूशी झुंज देत आहे.

अधिक वाचा : 12वी पास व्यक्ती भाजी विकून बनला करोडपती, स्टार्टअपची कमाल

स्वतःला जाळून घेत आपल्या प्रेयसीला मारली होती मिठी

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून पूजा आणि गजाननचे अनेक वर्षापासून प्रेमसंबंध होते. लग्न करणार तर तुझ्यासोबत नाहीतर तुलाही जिवंत राहू देणार नाही आणि मी राहणार नाही, असं म्हणत औरंगाबादमध्ये एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारली होती. या घटनेत तरूण गजानन हा 95% जळाला होता. त्याचा रात्री उपचारादरम्यान बारा वाजता मृत्यू झाला आहे. तरुणाच्या आई वडिलावर तरुणी पूजा साळवे हिच्या नातेवाईकांकडून लग्नासाठी तगादा लावून धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : कधी आहे आहे दर्श अमावस्या 'या' दिवशी काय केल्याने होईल फायदा 

मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं पण तिने ते ओळखलं नाही

मृत्युपूर्वी गजानने पूजावर आरोप केले होते. गजाननने म्हटलं होत की, मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. पण तिने ते ओळखलं नाही. त्यामुळे आपणही जगायचं नाही, तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेऊन स्वत:ला पेटवून घेतलं, असा जबाब गजानन मुंडे याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला. त्याचबरोबर, पूजाने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. पण तरीही सुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला सारखं टाळते, पोलिसांकडे तिने तक्रार सुद्धा दिली होती.

अधिक वाचा ; भारत वि. न्यूझीलंड टी-20 मॅच, कधी आणि कुठे पाहता येईल LIVE

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी