अपघातातील तरुण रूग्णालयात जमिनीवरच तडफडत होते, अखेर झाला मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jun 06, 2020 | 22:34 IST

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे गणेश देशमुख आणि सचिन भोसले अशी आहेत. दोघेही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी होते. त्या दोन्हीही तरुणांनी मद्यपान केले होते.

The young man was lying on the ground in the hospital, 'those' young man died in the accident, the video went viral
अपघातातील तरुण रूग्णालयात जमिनीवरच तडफडत होते,अखेर झाला मृत्यू,व्हिडिओ व्हायरल 

थोडं पण कामाचं

  • अपघातातील मृत तरुणांनी मद्यपान केले होते
  • कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर झाला होता अपघात
  • रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

बीड: बीड जिल्हा हा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. मात्र यावेळेस देखील ज्या बातमीने बीड जिल्हा चर्चेत आला आहे, ती अतिशय दुःखद घटना आहे. दरम्यान जिल्ह्याचे रुग्णालय देखील गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतो. गुरुवारी घडलेल्या अपघातात दोन जखमी तरुणांवर रुग्णालयात आणण्यात आलं गेलं होत. मात्र, त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने ते दोन्ही तरुणांनी तडफडत प्राण सोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या  घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर अपघात

अपघातात जीव गमावलेल्या तरुणांचा कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी ४ मे रोजी गढी या गावाजवळ जीप आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला होता. त्यामुळे या अपघातातील दुचाकीवरील असलेले दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणावर प्रथम जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने बीड येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं होत. मात्र, या रुग्णांवर एकाही डॉक्टरने उपचार केले नाहीत. धक्कादायक म्हणजे रुग्णांना बेडवर झोपवले नसून चक्क जमिनीवर झोपावले होते. दरम्यान दोन्ही अपघातातील तरुण अक्षरश: तडफडत होते. तरीदेखील एकही डॉक्टर किंवा रुग्णालयातील कर्मचारी या तरुणांच्या मदतीला धावून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्याप्रती नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे.

व्हिडिओ व्हायरल

दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामधे २ तरुण हे जमिनीवर तडफडत आहेत आणि त्यांच्या हाता, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यावर पट्टी देखील लावण्यात आली आहे. दरम्यान या दोन्ही रुग्णांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथे उपचार सुरू असताना या दोन्ही तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

तरुणांनी मद्यपान केले होते

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे गणेश देशमुख आणि सचिन भोसले अशी होती. दोघेही माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील रहिवासी होते. त्या दोन्हीही तरुणांनी मद्यपान केले होते आणि ते एका जागेवर बसत नसल्याने त्यांना जमिनीवर ठेवण्यात आले होते. त्या तरुणांवर आम्ही उपचार देखील केले होते मात्र ते गंभीररित्या जखमी झाले असल्याने त्यांना बाहेरच्या रूग्णालयात पाठवण्यात आले होते असं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी म्हटलं आहे.

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तरुणांचा मृत्यू?

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गणेश आणि सचिनचा मृत्यू झाला आहे. दोघांवर वेळीच उपचार झाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असं मृत तरुणांच्या नातेवाईकांनी रुग्णालयांच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशी सुरू असून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असं जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी