ऑक्सिजन अभावी राज्यात एकही मृत्यू नाही; आरोग्य मंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Jul 22, 2021 | 09:59 IST

There were no deaths due to lack of oxygen in the corona: नाशिक सारख्या घटनेत तर उलट ऑक्सिजन टॅंक भरलेला होता मात्र वेल्डिंग सारख्या काही तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली - टोपे

There were no deaths due to lack of oxygen in the corona
म्हणे ऑक्सिजन अभावी कोरोनात एकही मृत्यू झाला नाही  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • ईश्वर कृपेने , डॉक्टर यांच्या प्रयत्नाने व प्रशासनाच्या योग्य नियोजनाने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना कुठेही घडली नाही
  • तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली मात्र ऑक्सिजन कमी पडला नाही - राजेश टोपे
  • खासगी रुग्णालयात झालेले ३५०० मृत्यू ग्राह्य धरले - आकडेवारी लपवली नाही

उस्मानाबाद : कोरोना काळात मृत्यू झाले असले तरी या काळात ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती देत याबाबत सरकारने कोर्टात लेखी शपथपत्र दिल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ऑक्सिजन तुटवडा भासू नये यासाठी औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन सुद्धा वैद्यकीय कारणासाठी उपलब्ध करून दिला. ऑक्सिजनचा काटकसरीने वापर केला , यासाठी वॉर्डात ऑक्सिजन सिस्टर ही संकल्पना राबविली गेली असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ईश्वर कृपेने , डॉक्टर यांच्या प्रयत्नाने व प्रशासनाच्या योग्य नियोजनाने ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना कुठेही घडली नाही

 दुसऱ्या लाटेत रोज ६५ हजार लोक पॉझिटिव्ह येत असताना तब्बल १७०० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करून दिला गेला त्यात राज्यात १४०० व केंद्र सरकारने शेजारील राज्यातून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन रोज उपलब्द करून दिला होता त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता झाली नव्हती. ऑक्सिजन उपलब्ध करताना तारांबळ कसरत झाली होती रात्रीतून गाडी उपलब्ध झाली नाही तर काय करायचे अशी बिकट स्तिथी निर्माण झाली होती मात्र ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना ईश्वर कृपेने , डॉक्टर यांच्या प्रयत्नाने व प्रशासनाच्या योग्य नियोजनाने राज्यात कुठेही झाली नाही. 

तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली मात्र ऑक्सिजन कमी पडला नाही - राजेश टोपे

नाशिक सारख्या घटनेत तर उलट ऑक्सिजन टॅंक भरलेला होता मात्र वेल्डिंग सारख्या काही तांत्रिक कारणाने गॅस लीक झाला त्यामुळे दुर्घटना घडली मात्र ऑक्सिजन कमी पडला नाही. ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू न झाल्याचे शपथपत्र आम्ही कोर्टात दाखल केले आहे असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

खासगी रुग्णालयात झालेले ३५०० मृत्यू ग्राह्य धरले - आकडेवारी लपवली नाही

खासगी रुग्णालयात झालेले ३ हजार ५०० मृत्यू हे गेल्या ४ ते ५ दिवसात ऑनलाइन नोंद करीत ते ग्राह्य धरले आहेत त्यामुळे कोणीही आकडे लपविले हे म्हणणे चुकीचे आहे कोणी त्या भानगडीत पडत नाही.आम्ही अत्यंत पारदर्शक व प्रामाणिक पणे काम करीत आहेत. खासगी रुग्णालयात झालेले मृत्यू हे त्याचवेळी शासकीय रुग्णालयास कळवून त्याची नोंद घेणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही , याबाबत त्याच वेळी मृत्यू नोंदी घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत यासाठी मुख्यमंत्री, मुख्य सचिव स्तरावर लेखी पत्र काढून रूग्णालयांना नियमांचे कठोर पालन करण्यास आदेशीत केले जाईल. मुंबई लोकल बाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील तर आपण नेहमी नियमितपणे बर्ड फ्लू बाबत उपाययोजना करत असतो त्या आणखी अधिक प्रमाणात करू असे आरोग्य मंत्री टोपे म्हणाले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी