सिनेस्टाईल चोरी, ७ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर चोरट्यांनी ठेवला चाकू, आणि.....

Thieves put a knife on the neck of a 7-year-old boy : एका स्कॉर्पिओ गाडीतून आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही चोरटे दवाखान्याजवळ आले. त्यांनी दवाखान्याच्या पाठीमागील ग्रील तोडून आत प्रवेश केला. आणि तेथे असलेल्या कर्मचारी विशाल होळगे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विशाल होळगे हा गंभीर जखमी होऊन खाली पडला.

Thieves put a knife on the neck of a 7-year-old boy
७ वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर चोरट्यांनी ठेवला चाकू, आणि.....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून सुमारे सात लाखांचा ऐवज पळविला
  • हिंगोली जिल्ह्यतील कळमनुरी तालुक्यातील बाळापुर येथील घटना
  • पोलिसांच्या वाहनाचं सायरन ऐकून चोरट्यांनी पळ काढला.

हिंगोली : सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावून सुमारे सात लाखांचा ऐवज पळविला असल्याची घटना हिंगोली जिल्ह्यात घडली आहे. डॉक्टर सचिन देशमुख यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडून थेट आत प्रवेश करून चोरट्यांनी देशमुख यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला होता. सदर घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. सुरुवातीला चोरट्यांनी आखाडा बाळापूर येथील नवीन बसस्थानकाजवळील दवाखान्यात धुमाकूळ घालत कर्मचाऱ्याला मारहाण केली या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्यांनी देशमुख यांच्या बेडरुमचा दरवाजा तोडून आता प्रवेश करून सात वर्षांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि ७ लाखाचा ऐवज पळवून नेला.

अधिक वाचा : राज्यात तब्बल 'एवढ्या' आत्महत्या, मराठवाड्याचा आकडा मोठा

पोलिसांच्या वाहनाचं सायरन ऐकून चोरट्यांनी पळ काढला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका स्कॉर्पिओ गाडीतून आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही चोरटे दवाखान्याजवळ आले. त्यांनी दवाखान्याच्या पाठीमागील ग्रील तोडून आत प्रवेश केला. आणि तेथे असलेल्या कर्मचारी विशाल होळगे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत विशाल होळगे हा गंभीर जखमी होऊन खाली पडला. यानंतर, दवाखान्याच्या वरच्या मजल्यावर डॉ. देशमुख हे कुटंबासह राहत असलेल्या घरात शिरले आणि थेट बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आणि सात वर्षाचा मुलगा श्रीयांश देशमुख याच्या गळ्याला चाकू लावत ‘तुम्हारे पास जो है वो जल्दी दो, वरणा बच्चे को मार डालेंगे’, अशी धमकी दिली. यानंतर देशमुख कुटुंब घाबरले आणि त्यांनी जवळील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांना दिली. तरीदेखील चोरट्यांनी कपाटात उचका उचक केली. मात्र, पोलिसांच्या वाहनाचं सायरन वाजल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान, देशमुख यांनी झाली येऊन पहिले असता कर्मचारी जखमी अवस्थेत दिसला त्याला तत्काळ उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.

अधिक वाचा ; पैशांप्रामाणे ATM मधून निघणार गहू-तांदूळ; कशी असेल सुविधा 

दुकानांच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु

सदर घटनेनंतर देशमुख यांनी तत्काळ पोलिसांना सदर घटनेबद्दल माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ येऊन घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, श्वान पथक जागेवरच फिरले. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमध्ये नेमके चोरटे किती जण होते ते कोणत्या वाहनाने आले होते, याची खात्री पटलेली नाही. त्यामुळे बसस्थानक परिसरातील दुकानांच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चोरट्यांची ओळख पटवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आखाडा बाळापूर येथील साई नगर भागातील दोन ते तीन घरे फोडून चोरीचा प्रयत्न झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे आखाडा बाळापूरात एकच खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : इमर्जन्सी चित्रपटातील अनुपम खेरचा फर्स्ट लूक आला समोर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी