उस्मानाबाद : पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ मिळावे, या मागणीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thakrey) गटाचे आमदार पाटील (Kailas Patil ) हे गेल्या 3 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि अनुदानाचे पैसे येत नाहीत, तोपर्यंत उपोषणावरुन उठणार नसल्याचं आमदार कैलास पाटील यांनी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने ते दिवाळी हा सण साजरा करू शकले नाही, मीदेखील दिवाळी साजरी करणार नसल्याचे पाटील म्हणाले.
अधिक वाचा ; आम आदमी पार्टीचा आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा
आमदार कैलास पाटील यांनी पीकविमा आणि अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी केली होती. आपली मागणी मान्य नाही झाली तर उपोषणाचा इशारा आमदार कैलास पाटील यांनी केला होता त्यानुसार ते आमरण उपोषण करत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आपण उपोषण करणार असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. शेतकरी संकटात व दुःखात असल्याने मी दिवाळी शेतकऱ्यांसोबत उपोषण स्थळी करणार असून खराब झालेल्या सोयाबीनच्या राशीचे लक्ष्मीपुजन देखील कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्याला विमा कंपनी व सरकारकडे शेतकऱ्यांच्या मदतीचे 1200 कोटी रुपये मिळणार असून ती रक्कम थकीत आहे. ऐन दिवाळीत ठाकरे गट आमरण उपोषण व गनिमी कावा पद्धतीने आंदोलन करणार असल्याने सरकारच्या अडचणीत वाढ होणार आहे.
अधिक वाचा ; मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2020 च्या पीक विम्याची 531 कोटी रुपये जिल्ह्याची तीन लाख 57 हजार पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यात तात्काळ जमा करावी. 531 कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करताना शेतकरी संख्या बाधित क्षेत्र आणि नुकसान भरपाईच्या विमा रकमेत कोणतीही छुपी कपात करू नये. सन 2020-21 च्या पिक विम्याची उर्वरित 50 टक्के म्हणजेच 388 कोटी रुपयाची रक्कम ही विमा पात्र सहा लाख 67 हजार 287 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावे.
सप्टेंबर 2022 मधील सततचा पाऊस व अतिवृष्टी डगफुटी रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी 248 कोटी रुपये दोन लाख 48 हजार 801 शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावे.चालू खरीप हंगामात सततचा पाऊस अतिवृष्टी ढगफुटी पिकावरील रोगराईमुळे संपूर्ण पिके आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे त्यामुळे सरसकट दुष्काळ जाहीर करावा आणि पीडित शेतकऱ्यांना जीव घेण्या आर्थिक संकटातून दिलासा द्यावा. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे आजपर्यंतचे विमा व अतिवृष्टीचे बाराशे कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.
अधिक वाचा : बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) Wishes, Facebook-Whatsapp मेसेज