PhD केलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारनं घेतला हा मोठा निर्णय

औरंगाबाद
भरत जाधव
Updated Jan 18, 2022 | 12:50 IST

PhD Teachers :राज्यातील शालेय शिक्षण विभागात (School Education Department) रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना (Teachers)मिळण्याची शक्यता आहे.

PhD teachers
सरकारच्या निर्णयाने PhD शिक्षकांना येणार अच्छे दिन   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • ग्रामविकास खात्यानं सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतच एक पत्र नुकतेच पाठवले आहे.
  • राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत.
  • थोडीफार पगारवाढ मिळण्यापलीकडे फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणेही टाळतात.

PhD Teachers : औरंगाबाद : राज्यातील शालेय शिक्षण विभागात (School Education Department) रिक्त असलेल्या पदांवर अधिकारी होण्याची संधी शिक्षकांना (Teachers)मिळण्याची शक्यता आहे. विभागतील अनेक पदं वर्षानुवर्ष भरली गेलेली नाहीत. त्यामुळे क्लास वन, क्लास टू, शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer), केंद्रप्रमुख (Head of Center) या पदांवर पीएचडी (Ph.D.) झालेल्या शिक्षकांची नेमणूक केली जावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती.  (Big Decision taken by the State Government for PhD Teachers)

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधले 200पेक्षा जास्त शिक्षक पीएचडी झालेले आहेत. मात्र त्यांना थोडीफार पगारवाढ मिळण्यापलीकडे फारसा फायदा होत नाही. त्यामुळे अनेक शिक्षक नावाच्या आधी डॉक्टर लावणेही टाळतात. त्यामुळे अशा शिक्षकांना अधिकारी होण्याची संधी मिळाली, तर त्याचा फायदा राज्याच्या शिक्षणक्षेत्रालाच होईल, अशी भावना शिक्षक व्यक्त करत आहेत. दरम्यान या दिशेने राज्य सरकारने विचार सुरू केलं आहे.

ग्रामविकास खात्यानं सर्व विभागीय आयुक्तांना याबाबतच एक पत्र नुकतेच पाठवले आहे. अधिकारी होण्यासाठी आर्हतेमध्ये बसणा-या शिक्षकांची माहिती मागवण्यात आली आहे. औरंगाबादच्या शिक्षणाधिका-यांनी माहिती जमवायला सुरूवात केली आहे. शिक्षक संघटनेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. एकीकडे विद्यादान करताना स्वतःचाही शैक्षणिक विकास करणारे अनेक शिक्षक आहेत. या शिक्षकांना अधिकारी केल्यास ते अधिक योग्य ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी