MIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी केला खळबळजनक दावा

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Aug 04, 2020 | 08:34 IST

This is the reason why Corona patients do not get the benefit of the scheme!सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या यांच्या बैठकीत सदर विषयी चर्चा देखील करण्यात आली आहे.

This is the reason why Corona patients do not get the benefit of the scheme!
कोरोनाच्या रुग्णांना योजनेचा लाभ 'न' मिळण्याचे हे कारण जलील!  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • किमान ६५ हजाराचा तरी लाभ मिळावा
  • योजनेचा लाभ मिळू नये यासाठी खासगी रुग्णालयाची एक लॉबी बनली आहे
  • मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून देखील लाभ मिळत नाही

औरंगाबाद: कोरोना व्हायरसच्या (corona virus) पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने (aurangabad district corona) हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर योग्य उपचार व्हावा यासाठी प्रशासन आणि सरकार प्रयत्न करत आहे. मात्र औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासगी रुग्णालयावरती गंभीर आरोप केले आहेत. खासदार इम्तियाज जलील (mp imtiyaj jalil) यांच्या या आरोपामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले इम्तियाज जलील?

दरम्यान, इम्तियाज जलील यांनी खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत, मात्र या योजनेचा लाभ मिळू नये यासाठी खासगी रुग्णालयाची एक लॉबी बनली आहे. ती कोरोनाच्या रुग्णांना लाभ मिळू देत नाही. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.

मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून देखील लाभ मिळत नाही

पुढे बोलताना जलील म्हणाले कि, दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या यांच्या बैठकीत सदर विषयी चर्चा देखील करण्यात आली आहे. मात्र याविषयाचा तोडगा देखील निघाला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thakre), आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (helth minister rajesh tope) यांच्यासह प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना सांगून देखील, जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. सदर योजना कशी टाळता येईल यासाठी खासगी रुग्णालये प्रयत्न करत असतात.

किमान ६५ हजाराचा तरी लाभ मिळावा

दरम्यान जलील म्हणाले कि, राज्य सरकरने जी ६५ हजाराची मर्यादा घालून दिली आहे,कमीत कमी तेवढा तरी लाभ मिळावा. अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी केवळ २०० रुग्णांनाच याचा लाभ मिळाला आहे. मात्र इतर रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बीले आकारली जाता आहेत. जे खासगी दवाखाने या जोजानेचा लाभ रुग्णांना मिळू देत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील जलील यांनी केली आहे. दरम्यान जलील म्हणाले कि, एखादा कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर त्याच्या घरातील सर्वच लोकांना कुठलीच लक्विषणे नसताना विलगीकरण कशात ठेवणे देखील योग्य नाही. 

औरंगाबाद कोरोनाची स्थिती

औरंगाबेत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्ह्यात आज आलेल्या अहवालानुसार ८७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यानुसार औरंगाबाद येथील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १४६४० इतकी झाली आहे. दरम्यान त्यापैकी १०९०१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र जिल्ह्यात ४८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या ३२५५ कोरोना बाधित रुग्णावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी