औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर (Minor girl) तिच्या सावत्र मामाने सतत बलात्कार (rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आजीने पोलिसात तक्रार दिली आहे. औरंगाबादच्या उस्मानपुरा (usmanpur) पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मामाने ३ वेळेस बलात्कार केल्याचे तक्रार आजीने दिली आहे.
उस्मानपुरा पोलिसांनी (police) या खळबळजनक घटनेप्रकरणी माहिती दिली आहे. पीडिेतेचे वडील हे उस्मानपुरा येथे राहत असून त्याने चार लग्न केली आहेत. एक व्यक्ती कुटुंबाबरोबर राहत होती. या व्यक्तीला ४ बायका आहेत. २ पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आणि एक पत्नी सोडून गेल्यावर या इसमान चौथं लग्न केले आहे. पहिल्या पत्नीपासून या इसमाला २ मुले आहेत, तर दुसऱ्या पत्नीपासून २ मुली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चौथ्या पत्नीचा भाऊ घरी आला होता. तेव्हा त्यांने आपल्याच भाचीवर अतिप्रसंग केला. १३ वर्षांच्या चिमुरडीवर त्याने जबरदस्तीने ३ वेळा बलात्कार केला आहे. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी पूर्णपणे बिथरली होती. घाबरलेल्या अल्पवयीन मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. पण झालेल्या त्रासामुळे तिला रडू आवरत नव्हतं. दरम्यान, सध्या या पीडित मुलीवर बलात्कार करणारा तिचा सावत्र मामा फरार आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
Read Also : प्रियकरानं पैशांसाठी प्रेयसीला विकलं
अत्याचारानंतर खूप घाबरलेली होती, त्यामुळे ती रडू लागली. तिचे रडणे बघून मुलीच्या वडिलांनी तिला आजीकडे जाण्यास सांगितले होते. तेव्हा हे सर्व धक्कादायक प्रकार मुलीने आपल्या आजीला आणि सावत्र भावाला सांगितला. या सगळ्या प्रकारानंतर पीडितेच्या आजीने पोलीस स्टेशन गाठले आणि सावत्र मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र मामाने आपल्याच १३ वर्षांच्या भाचीवर ३ वेळा बलात्कार केला आहे. ही धक्कदायक घटना २५ एप्रिल दिवशी घडली आहे.