Throwing stones at the bus उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही बसवर दगडफेक

Throwing stones at the bus in osmanabad : उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद- पुणे या बसवर कौडगाव जवळ दगफेक करण्यात आली आहे.

 Throwing stones at the bus in osmanabad
उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही बसवर दगडफेक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे बसवर दगडफेक करण्यात आली
  • दगडफेक करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
  • उद्या बस सेवा सुरूच राहणार - विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर

Throwing stones at the bus  उस्मानाबाद - विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप दिवसेंदिवस चिघळत आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तानंतरही दोन बसवर दगडफेक करण्यात आली. गेल्या जिल्ह्यातील महिनाभरापासून एसटी सेवा ठप्प आहे. ही बस सेवा सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याच अनुषंगाने आज उस्मानाबाद आगारातून पोलीस बंदोबस्तात अकरा बस सुरू करण्यात आल्या आहेत. यापैकी उस्मानाबाद उमरगा ही बस उमरगा येथून परतत असताना उमरगा शहराबाहेरील चौरस्ता येथे दगडफेक करण्यात आली आहे. तसेच उस्मानाबाद- पुणे या बसवर कौडगाव जवळ दगफेक करण्यात आली आहे.

उद्या बस सेवा सुरूच राहणार - विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर

आज दोन बसवर दगडफेक झाली असली तरी पोलीस बंदोबस्तात उद्या बस सेवा सुरू राहणार आहे. दगडफेक करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली आहे.

एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. वेतन वाढ करावी त्याचसोबतस एसटीचे महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागण्यासाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून सरकार यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते मात्र, तोडगा निघत नव्हता अखेर एसटी महामंडळाने संपावर तोडगा म्हणून वेतनवाढीची घोषणा केली आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले. काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र, काही कर्मचारी आतापर्यत कामावर हजर झाले नाहीत.  

ज्यांनी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे त्यांच्यावर प्रशासकिय कारवाई

ज्यांनी कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला आहे त्यांच्यावर प्रशासकिय कारवाई तर होईलच सोबतच फौजदारी कारवाई देखील होणार आहे, असंही शेखर चन्ने म्हणाले आहेत. दरम्यान, मेस्माअंतर्गत कायद्यांर्तगत जे कर्मचाऱ्यांना संपात सहभागी होण्यासाठी मदत करतात. जे संप चालवण्यासाठी पैसा पुरवतात. तसेच जे अफवा पसरवतात किंवा जे संपात सहभागी झाले आहेत, यांच्यावर कारवाई होते. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अटक होते शिवाय यामध्ये जामीन देखील मिळत नाही. नागरिकांना काही अत्यावश्यक सेवा मिळायलाच हव्या. त्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो. अनेकदा साठेबाजी किंवा अत्यावश्यक सेवा विस्कळीत करणाऱ्या मोर्चा आणि आंदोलनाला रोखण्यासाठी मेसमा कायदा लावण्यात येतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी