मोबाईल घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून थेट बँक फोडण्याचा प्रयत्न, अल्पवयीन मुलाचा प्रताप

trying to rob a bank to for- buying mobile in hinoli : सदर मुलाला महागडा मोबाईल वापरण्याची इच्छा झाली कारण त्याला गाण्याचा भलताच नाद होता आणि गाणे ऐकण्यासाठी चांगला मोबाईल हवा होता. यासाठी त्याने थेट हिंगोली शहरालगत असलेली बँक ऑफ इंडीयाची शाखा गंगानगर ही बँक फोडण्याचा प्रयत्न केला

trying to rob a bank to for- buying mobile in hinoli
मोबाईल घेण्यासाठी पैसे नव्हते म्हणून थेट बँक फोडण्याचा प्रयत्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अंधाराचा फायदा घेऊन त्याने बँकेच्या पाठीमागील भितींला छिद्र पाडण्यास सुरवात केली
  • शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यास बँकेत खाते काढण्यास सांगितले होते
  • अल्पवयीन मुलाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

हिंगोली : हौसेला मोल नसत असं म्हटलं जात ही म्हण अगदी सत्यात उतरताना दिसत आहे मात्र चुकीच्या मार्गाने. कोणाला महागड्या गाड्याची हौस असते तर कोणाला महागड्या मोबाईलची. सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक महागडे मोबाईल उपलब्ध आहेत. त्यामुळे, तरुणाईमध्ये तर मोबाईल घेण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, आपल्याकडे महागडा मोबाईल घ्यायला पैसे नाहीत यामुळे एका तरुणाने चक्क बँक फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटना हिंगोली येथील असून, बँक फोडण्याचा प्रयत्न करणारा मुलगा मात्र अल्पवयीन असल्याचं समोर येत आहे.

अल्पवयीन मुलाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

सदर मुलाला महागडा मोबाईल वापरण्याची इच्छा झाली कारण त्याला गाण्याचा भलताच नाद होता आणि गाणे ऐकण्यासाठी चांगला मोबाईल हवा होता. यासाठी त्याने थेट हिंगोली शहरालगत असलेली बँक ऑफ इंडीयाची शाखा गंगानगर ही बँक फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न पोलीस आणि नागरीकांच्या सतर्कतेने फसला. या प्रकरणी शनिवारी ता. २५ पहाटे त्याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यास बँकेत खाते काढण्यास सांगितले होते

मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगा हा हिंगोली तालुक्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. परंतु तो नांदेड जिल्ह्यातील शाळेत इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेतो. शाळेकडून त्याला शिष्यवृत्ती मिळत असल्याने त्यास बँकेत खाते काढण्यास सांगितले होते. त्यामुळे तो मागील काही दिवसांपुर्वी तो गावाकडे आला होता. खाते काढण्यासाठी दोन महिन्यापुर्वी त्याची आई त्याला सोबत घेऊन हिंगोली शहरालगत गंगानगर येथील बँक ऑफ इंडीया या बँकेच्या शाखेत आली होती. यावेळी त्या मुलाने संपूर्ण बँक फिरून पाहिली होती. त्याला कॅशीयर जवळ खूप जास्त पैसे असल्याचे दिसून आले होते. कॅशीयरकडे मोठ्या प्रमाणात पैसे दिसून आल्याने त्याने बँक फोडण्याचा प्लान रचला. 

अंधाराचा फायदा घेऊन त्याने बँकेच्या पाठीमागील भितींला छिद्र पाडण्यास सुरवात केली

शुक्रवारी ता. २४ रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सदर अप्लावायीन मुलाने लोखंडी रॉड घेऊन बँकेच्या मागे लपला. आणि अंधाराचा फायदा घेऊन त्याने बँकेच्या पाठीमागील भितींला छिद्र पाडण्यास सुरवात केली. मात्र, छिद्र पडत असताना आवाज येऊ लागला त्यामुळे नागरिक देखील जमले. आणि गस्तीवर असलेल्या जमादार सुधीर तपासे यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मात्र, त्याने अंधाराचा फायदा घेऊन त्याने पळ काढला. दरम्यान, तो मुलगा सावरखेडा गावाकडे पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे संपर्क साधला असता. त्या ठिकाणी रस्त्याच्या कामावर असलेल्या मजूरांनी त्यास पकडून ठेवले. त्यानंतर त्यास पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता गाणे ऐकण्यासाठी मोबाईल नसल्यामुळे हा प्रकार केल्याचे त्याने पोलिसांना कबुली दिली आहे. या प्रकरणी त्या मुला विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी