तुळजाभवानी मंदिरात भाविक, व्यापारी,पुजारी विनामास्क, मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लंघन, गर्दीही वाढली

औरंगाबाद
अजहर शेख
Updated Feb 23, 2021 | 12:14 IST

tuljabhavani mata temple not follow corona rules : ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकाना आणि १० वर्षाखालील मुलांसह नवजात बालकांना बालकांना प्रवेश प्रवेश देण्यास मनाई आहे.

tuljabhavani mata temple not follow corona rules
तुळजाभवानी मंदिरात भाविक, व्यापारी,पुजारी विनामास्क, मोठ्या प्रमाणात नियमांचं उल्लंघन   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • मनाई असतानाही खुलेआम प्रवेश
  • कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर प्रशासन कारवाई का करत नाही?
  • देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार, रविवार या ३ दिवशी मोठी गर्दी असते

उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून कोरोना (corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यात (osmanabad district) पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी(tuljabhavani temple) मातेच्या मंदिरात देखील कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचा आदेश पायदळी तुडवला जात असल्याचे पहायला मिळाले आहे. कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून देखील भक्त नियम पाळताना दिसून येत नसल्याने पुन्हा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनाई असतानाही खुलेआम प्रवेश

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी घेतली जात आहे. मात्र, तुळजापूर मंदिरात मनाई असताना देखील ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि १० वर्षाखालील मुलांसह नवजात बालकांना बालकांना प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, देखील ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकाना आणि १० वर्षाखालील मुलांसह नवजात बालकांना बालकांना प्रवेश प्रवेश देण्यास मनाई आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन होतना दिसत नाही.

लॉकडाउन नको आहे मात्र ते नियमही पळत नाहीत

मंदिरात सॅनिटायझिंग किंवा इतर उपाययोजना करताना मंदिर प्रशासन दिसत नाहीत. व्यापारी, पुजारी, भाविक विनामास्क फिरत असून त्यांना लॉकडाउन नको आहे मात्र ते नियमही पळताना दिसून येत नाहीत. मंदिर परिसरात जवळपास ५० टक्के भाविक विनामस्क मंदिरात येत असले तरी स्थानिक प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.

कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर प्रशासन कारवाई का करत नाही?

परिस्थितीत उस्मानाबाद आणि तुळजापूर प्रशासन कोरोना नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर कारवाई का करत नाही?, असा सवाल विचारण्याची वेळ आली आहे. दरम्यान, राज्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्य लक्षणीयरित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

देवीच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवाररविवार या ३ दिवशी मोठी गर्दी असते

तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. त्यामुळे या ३ दिवशी आणि महत्वाच्या सण, उत्सवाच्या दिवशी ३० हजार मोफत पास दिले जात होते तर हे ३ दिवस वगळता इतर दिवशी २० हजार भाविकांना दर्शन पास दिले जात होते मात्र त्यात आता घट करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी