औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. विजेच्या ताराला बैलाच्या शिंगाचा विजेच्या ताराचा स्पर्श लागल्याने दोन सख्या भावासह दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना वैजापूर तालुक्यात बायगाव वस्तीमध्ये घडली आहे. सदर घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी कन्नड तालुक्यातील नावाडी इथे घडली होती. या घटनेत देखील चौघांचा मृत्यू झाला होता. सदर घटना ताजी असतानाच वैजापूर तालुक्यात असाच प्रकार समोर आला आहे.
अधिक वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती
मिळालेल्या माहितीनुसार, विजेच्या ताराचा स्पर्श होऊन घडलेल्या दुर्दैवी घटनेत बैलासह दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत साहेबराव गणपत पाटील चेळेकर वय ७० वर्षे आणि त्यांचे लहान भाऊ बाबुराव गणपत पाटील चेळेकर वय ५७ वर्ष (राबायगाव वस्ती, तालुका वैजापूर) अशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.
अधिक वाचा : तरुणाची तिघांनी घरात घुसून केली हत्या, पोलीस आले तेव्हा...
शेतातील बोअरच्या कामासाठी टाकलेल्या विजेची तार टाकण्यात आली होती. आणि याच ताराचा स्पर्श बैलाच्या शिंगाला झाला. बैलगाडी लोखंडी असल्याने वीजप्रवाह संपूर्ण गाडीत पसरला. आणि या गाडीत असलेल्या एकाला याचा जबर धक्का बसला. भावाला विजेचा धक्का बसला असल्याचे पाहून दुसरा भाऊ त्याला वाचवण्यासाठी गेला. मात्र, त्याला देखील विजेचा धक्का बैलासह दोन सख्ख्या भावांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला.
अधिक वाचा ; उन्हाचे चटके, युरोप होरपळतोय उष्णतेच्या लाटेत;रस्तेही वितळले
दिवसभर कष्ट करून साहेबराव गणपत चेळेकर हे आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. साहेबराव यांनी बैलगाडी जुंपली आणि जुना बायगाव - देवगाव रंगारी गाडीवाटेने लोखंडी बैलगाडी हाकत घराकडे येत होते. मात्र, याच रस्त्यावर दुसऱ्या एका शेतकऱ्याचे बोरसाठी रस्त्यावर लटकलेले एक सर्व्हिस वायर बैलांच्या शिंगात अडकले. यानंतर वीज प्रवाहचा तीव्र धक्का बसून तो बैल जागीच ठार झाला. आणि पूर्ण वीजप्रवाह गाडीत पसरला आणि यानंतर या दोन्ही भावांचा मृत्यू झाला.
साहेबराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातू, पणतू तर बाबुराव चेळेकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच शिऊरचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह उपनिरीक्षक ए.जे. नागटिळक, पोलीस कर्मचारी जाधव, पवार यांनी देवगाव रंगारी ग्रामीण रुग्णालयात येऊन पंचनामा केला.