Osmanabad : उस्मानाबादेत शिवसेनेत २ गट, सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण

Two groups in Shiv Sena in Osmanabad : तानाजी यांचे पुणे येथील कार्यालय शिवसेनेच्या वतीने फोडण्यात आले होते. यानंतर आता तानाजी सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालय देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर कार्यालयाच्या शटरवरती गद्दार खेकडा असं देखील लिहिले आहे

Two groups in Shiv Sena in Osmanabad
सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उस्मानाबादेत शिवसेनेचे पडले दोन गट
  • तानाजी सावंत यांच्या गटाने तोडफोड करणाऱ्याना दिला इशारा
  • सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण करीत खेकडा सावंत गद्दार असे काळे लिहलेले खोडून काढले

Tanaji Sawant : पुणे : काही वेळांपूर्वी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालय शिवसैनिकांच्या वतीने फोडण्यात आले आहे. त्याचबरोबर तानाजी सावंत यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी काळे फासत गद्दार खेकडा असं देखील लिहिले होते. यानंतर तानाजी सावंत यांच्या गटाचे देखील कार्यकर्ते त्या ठिकाणी गोळा झाले आणि त्यांनी . शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून सावंत समर्थकांनी सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण करीत खेकडा सावंत गद्दार असे काळे लिहलेले खोडून काढले आहे. दरम्यान, आता राज्यात घडत असलेल्या घडामोडीनंतर उस्मानाबादमध्ये देखील शिवसेनेचे दोन गट पहायला मिळाले आहे. शिवसैनिकांनी आमदार सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करीत काळे फसल्यानंतर सावंत समर्थकांचा गट देखील आक्रमक झाला असल्याचे पहायला मिळाले आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या गटातील नेत्यांनी म्हटलं आहे की, हे कृत्य भामट्यांनी केलं आहे. या याच्या पाठीमागे कोण आहे हे आम्हाला माहिती आहे आम्ही योग्य वेळी उत्तर देऊ असं तानाजी सावंत यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, बंडखोर एकनाथ शिंदेंचे पंख छाटले

सावंत यांचे पुण्यातीलही कार्यालय शिवसेनेने फोडले

तानाजी यांचे पुणे येथील कार्यालय शिवसेनेच्या वतीने फोडण्यात आले होते. यानंतर आता तानाजी सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालय देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे. उस्मानाबाद येथील शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत होते. दरम्यान, कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर कार्यालयाच्या शटरवरती गद्दार खेकडा असं देखील लिहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत अनेक आमदारांना आपल्या सोबत घेऊन गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे शिवसेनेचे आमदार गेले आहेत त्याच्या कार्यालयाची तोडफोड आता शिवसेनेने सुरु केली आहे. भूम – परंडा –वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड देखील शिवसेनेन केली आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात असणाऱ्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत तोडफोड केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान देखील झाले आहेत.  

अधिक वाचा ; पीएम मोदींनी शंकराप्रमाणे अनेक वर्षे विषपान केले : अमित शहा 

शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली शिवसैनिक

दरम्यान, सावंत यांचे कार्यालय फोडल्यावर शिवसैनिकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सावंत हे सत्ता असताना शिवसेनेत आले त्यांनी सर्व पद उपभोगली आणि आता पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची सुरूवात पुण्यात झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकारे आंदोलन केले जाईल असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे.

अधिक वाचा : पैसे मोजताना करू नका 'ही' चूक, नाहीतर होईल लक्ष्मी मातेचा को

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी