Raj Thackeray : राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांना धडकल्या

Two to three vehicles of Raj Thackeray's convoy collided with each other from behind : मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुण्याहून अहमदनगरमार्गे औरंगाबादच्या दिशेने निघाले असताना सदर अपघाताची घटना घडली आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांची १ मे रोजी (रविवारी) भव्य सभा होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे हे आज पुण्यातून औरंगाबादसाठी निघाले असताना त्यांचा या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी स्वागतही केलं जात आहे.

Two to three vehicles of Raj Thackeray's convoy collided with each other from behind
राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या एकमेकांना धडकल्या  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राज ठाकरेंच्या ताफ्यातील मागील बाजूस असलेल्या तीन गाड्याचा अपघात
  • तीन गाड्या पाठीमागून एकमेकांना धडकल्या
  • या अपघातात अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचा बोनटचे थोडे नुकसान

अहमदनगर राज ठाकरेंच्या ताफ्यातील मागील बाजूस असलेल्या तीन गाड्याचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या तीन गाड्या पाठीमागून एकमेकांना धडकल्या असल्याचं समजत आहे. सदर अपघातात कोणालाही दुखापत झाली नसल्याही माहिती मिळाली आहे. अहमदनगरच्या पुढे घोडेगाव जवळ या गाड्या पाठीमागून एकमेकांना धडकल्या आहेत. दरम्यान, या अपघाताबद्दल अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही नसून, या अपघातात अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचा बोनटचे थोडे नुकसान झाल्याची माहितीमिळाली आहे.

अधिक वाचा : ईडीचा हातोडा आता चीनी शाओमीवर, जप्त झाले कंपनीचे 5,551 कोटी

राज ठाकरे यांचा ताफा औरंगाबादकडे जाताना घडला अपघात

मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुण्याहून अहमदनगरमार्गे औरंगाबादच्या दिशेने निघाले असताना सदर अपघाताची घटना घडली आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांची १ मे रोजी (रविवारी) भव्य सभा होणार आहे. दरम्यान, राज ठाकरे हे आज पुण्यातून औरंगाबादसाठी निघाले असताना त्यांचा या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी स्वागतही केलं जात आहे. यामध्येच आता अहमदनगर पुढील घोडेगाव नजीक हा अपघात झाला आहे. 

अधिक वाचा : महाराष्ट्र दिनानिमित्त सोशल मीडियावर शेअर करा शुभेच्छा

औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला राज ठाकरे यांनी ३ मे रोजीचा अल्टिमेटम दिला असल्याने १ मे रोजी होणाऱ्या सभेमध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आवाहन करतात यासाठी औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.

अधिक वाचा ; शिवसेना सोडून मी राजकीय कारकीर्द पणाला लावली होती: भुजबळ 

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर वॉर

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये पोस्टर (poster war) वॉर बघायला मिळालं आहे. जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं ठिकठिकाणी शिवसेनेचे पोस्टर लावले गेले असून, मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहायला मिळत आहे. उद्या म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांची भव्य सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता काही तासातच औरंगाबादेमध्ये पोहोचणार असून, त्यांच्या येण्याआधीचं औरंगाबादमध्ये शिवसेनेने जागोजागी पोस्टर बाजी केली असल्याने उद्याची होणारी मनसेची सभा नेमकी कशा पद्धतीने पार पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर १ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा  आयोजित करण्यात आली आहे. पोलिसांनी काही अटी-शर्तींच्या आधारावर सभेला परवानगी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी