बापरे ! धावत्या बसचे निखळली दोन चाकं, १२ प्रवाशी करत होते प्रवास

Two wheels of the running bus came loose : सदर बसचा वेग हा कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, वेग कमी असल्याने चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली असल्याचं प्रवाशी म्हणाले. मागील डाव्या बाजूच्या दोन पैकी एकच चाक उरल्याने बसचा रॉड तुटला आणि उरलेला दुसराही चाक निखळून पडला. त्यामुळे बस एका बाजूला झुकली होती.

Two wheels of the running bus came loose
धावत्या बसचे निखळले दोन चाक, १२ पप्रवाशी करत होते प्रवास   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एसटी धावत असतानाच एकामागून एक असे दोन टायर निखळले
  • खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात आदळली
  • वेग कमी असल्याने चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळविले

औरंगाबाद : औरंगाबाद : खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघाताने अनेक निरपराध लोकांचे जीव जात असल्याच्या अनेक घटना आपण रोज बघत आहोत. दरम्यान, आज औरंगाबाद जिल्ह्यात देखील खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताने धावत्या एसटी बसचे एकामागून एक असे दोन टायर निघून पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात सदर घटना घडली आहे. एसटी धावत असतानाच एकामागून एक असे दोन टायर निखळले. मात्र, या अपघातातसुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडी रस्त्यावरील खड्ड्यात गेल्याने सुरुवातीला एक टायर निखळले आणि त्यांनतर बसचा रॉड तुटला आणि दुसरेही टायर निखळून पडले. विशेष म्हणजे या बसमधून दहा ते बारा जण  प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.

अधिक वाचा : लग्न जमावे म्हणून राज्यकर उपायुक्त होत असल्याचा केला बनाव

खड्ड्याचा अंदाज न आल्याने गाडी खड्ड्यात आदळली

मिळालल्या माहितीनुसार, गवळीशिवार गावाच्या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा चालकाला अंदाज न आल्याने बसचा पाठीमागचा चाक खड्ड्यात आदळला. खड्डा मोठा असल्याने बसचा टायर निखळून बाहेर आला. यावेळी गाडी जोरात आदळली आणि लोखंडी रॉड तुटल्याने दुसरे चाक देखील निघाले. सदर बस ही गंगापूर आगाराची आहे. या बसचा (क्रमांक एम.एच. २० बि. एल २०१०) असा आहे. लासूर स्टेशन येथून जवळच असलेल्या, गवळीशीवरा गाजगाव मार्गे औरंगाबादकडे निघाली होती. मात्र, बसचा रस्त्यात अपघात झाल्याने प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाल्याचे पहायाला मिळाले.

अधिक वाचा ; शुक्र करणार कर्क राशीत गोचर, या राशीच्या लोकांना होणार फायदा

वेग कमी असल्याने चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळविले

सदर बसचा वेग हा कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्रवाश्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, वेग कमी असल्याने चालकाने तात्काळ बसवर नियंत्रण मिळवत बस थांबवली असल्याचं प्रवाशी म्हणाले. मागील डाव्या बाजूच्या दोन पैकी एकच चाक उरल्याने बसचा रॉड तुटला आणि उरलेला दुसराही चाक निखळून पडला. त्यामुळे बस एका बाजूला झुकली होती.

अधिक वाचा : दानवे म्हणाले,अगोदर स्वतःच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवा, आणि.. 

बसमधून तब्बल १२ प्रवाशी करत होते प्रवास

श्रावण महिना सुरु असल्याने गवळीशिवरा येथील महारुद्र मारुतीच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. त्यातच आज शनिवार असल्याने भाविकांची गर्दी असते. त्यामुळे चालकाने वेळीच बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, सदर बस मधून एक दोन नव्हे तर तब्बल १२ प्रवाशी प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी