Osmanabad news दसऱ्यानंतर वाघ आणि छावा येणार मैदानात, तानाजी सावंतांच्या मतदारसंघात सरदेसाई विरोधकांवर बरसले

uddhav thackerays visit across the state : युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांच्या भूम मतदारसंघात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला युवकांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला आहे. यावेळी सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा देखील साधला आहे.

uddhav thackerays visit across the state
दसऱ्यानंतर वाघ आणि छावा येणार मैदानात - सरदेसाई   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दसऱ्यामध्ये विचारांचे सोने लूटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार
  • वरून सरदेसाई यांनी वाघ आणि  छावा मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे
  • शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात घेण्यात आला मेळावा

उस्मानाबाद : दसऱ्यामध्ये विचारांचे सोने लूटल्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thakrey) आणि आदित्य ठाकरे (aditya thakrey) हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर (maharahstra tour) असणार असल्याचं युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले आहे. दरम्यान,  सरदेसाई यांनी वाघ आणि  छावा मैदानात उतरणार असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांचे कौतुक केले. शिवसंवाद यात्रा सुरु असतानाच दुसरीकडे युवा सेनेचे सचिव सरदेसाई हे देखील तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. सरदेसाई घेत असलेल्या मेळाव्यांना देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सरदेसाई हे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या भूम परंडा वाशी या मतदारसंघात आहेत. यावेळी सरदेसाई यांनी शिंदे गटावर सडकून टीका केल्याचे पहायला मिळाले आहे. (uddhav thackerays visit across the state)

अधिक वाचा '; Brahmastra च्या नकारात्मक कमेंटवर आलिया भट्टनं सोडलं मौन

नेमकं काय म्हणाले वरून सरदेसाई?

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु असतानाच दुसरीकडे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे देखील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेत आहेत. दसऱ्यापर्यंत संपूर्ण राज्यात असे मेळावे असणार असल्याचं सरदेसाई यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत छावा मैदानात होता आता दसऱ्यानंतर वाघच मैदनात उतरणार असल्याचे सरदेसाई हे म्हणाले आहेत.

अधिक वाचा : आहारात करा या बियांचा समावेश...मग पाहा जादू, आजार राहतील दूर 

सरदेसाई यांचा मेळावा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातील भूम येथे पार पडला. या मेळाव्याला उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील उपस्थित होते. ओमाराजे यांनी बोलताना म्हटलं की, हा मतदार संघ काय शिवसेनेकडे राहिलेला आहे. त्यामुळे या भागातील जनता गद्दारी खपवून घेणार नाही. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षप्रमुख हे आता आक्रमक स्वरुप धारण करणार आहेत असल्याचं देखील ओमराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यापूर्वीच त्यांनी स्पष्टीकरण दिले असून शिवसेनेचा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचं देखील ओमराजे म्हणाले.

अधिक वाचा ; Happy Birthday PM:आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 72 वा वाढदिवस

अधिक वाचा : 'या' राशींसाठी पुढचे 4 महिने एकदम बेस्ट, पडेल पैशांचा पाऊस

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी