पत्नीपिडीत पुरुषांच्या झाडाला १०८ उलट्या प्रदक्षिणा, ७ सेकंदही अशी बायको नको म्हणत साजरी केली पिंपळपौर्णिमा

Unique agitation of victim men at Aurangabad : पुरुषांनी केलेल्या या आंदोलनात त्यांनी थेट यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि थेट यमराजाकडे मनोगत व्यक्त करत म्हटलं आहे की, वटपोर्णिमा साजरी करताना या पत्नीपीडित पुरुषांनी नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको, असं म्हणत पुरुषांनी महिलांच्या अगोदर वटपौर्णिमा साजरी केली आहे.

Unique agitation of victim men at Aurangabad
७ सेकंदही अशी बायको नको म्हणत साजरी केली पिंपळपौर्णिमा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पत्नी पिडीत पुरुषांनी आता आपल्याला ही बायको नको म्हणत वडाच्या झाडाची पूजा केली पूजा
  • ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको – पुरुषांनी दिल्या घोषणा
  • पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं

औरंगाबाद : पत्नीपीडित पतींनी पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारत हीच पत्नी पुढचे सात जन्म नको म्हणून पिंपळाला फेऱ्या मारत यमराजाकडे मनोकामना केली औरंगाबाद येथे केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उद्या वटपौर्णिमा सण साजरा केला जाणार आहे. या सणादिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून सात जन्म तोच पती मिळावा अशी प्रार्थना करते. मात्र, पत्नी पिडीत पुरुषांनी आता आपल्याला ही बायको नको म्हणत वडाच्या झाडाची पूजा करत फेऱ्या देखील मारल्या आहेत.

अधिक वाचा : झुडपात लपलेला लांडगा शोधताना सगळ्यांना घाम फुटला, पाहा फोटो

७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको – पुरुषांनी दिल्या घोषणा

दरम्यान, पत्नीपिडीत पुरुषांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा राज्यभर होत आहे. पिंपळाच्या झाडाला गोल फिरत दोरा बांधून मुंजा असलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा या पत्नीपीडित पुरुषांनी केली. सोबतच पुढील ७ जन्मच काय ७ सेकंद सुद्धा अशी बायको नको, अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पिंपळाच्या झाडाला उलट्या १०८  प्रदक्षिणा घालत पत्नीपीडित पुरुषांनी पूजन देखील केले आहे. तसेच पुरुषांना त्रास देणा-या महिलांचा सदर पुरुषांनी निषेध देखील केला. दरम्यान, औरंगाबादच्या वाळूज भागात असलेली पत्नीपीडित नावाची ही संघटना नेहमीच पत्नीच्या छळापासून त्रासलेल्य़ा नव-यांना मदत करण्याचे काम करते. यांच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

अधिक वाचा : खिशात पैसा राहत नाही? घराच्या मुख्य दरवाजासंबधी करा हे उपाय 

पुरुषांनी पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं

पुरुषांनी केलेल्या या आंदोलनात त्यांनी थेट यमराजाकडे आपलं मनोगत व्यक्त केलं. पिंपळाच्या झाडाला दोरा बांधत प्रदक्षिणा घातल्या आणि थेट यमराजाकडे मनोगत व्यक्त करत म्हटलं आहे की, वटपोर्णिमा साजरी करताना या पत्नीपीडित पुरुषांनी नवऱ्याला छळणाऱ्या बायकांचं ऐकू नको त्या खोटं बोलत आहेत. या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मीतरी, अशी बायको देऊ नको, असं म्हणत पुरुषांनी महिलांच्या अगोदर वटपौर्णिमा साजरी केली आहे. पत्नीपीडित नवरोबांची पिंपळपौर्णिमाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे-आठवले

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी