उस्मानाबाद जिल्ह्यात पाऊस पडावा म्हणून महादेव पिंड घातली पाण्याखाली! पहा व्हिडीओ

Unique initiative taken by the villagers for rain in osmanabad : उस्मानाबाद जिल्ह्यतील सारोळा येथील श्री महादेव मंदिरात पहाटेपासूनच महादेव पिंड पाण्याने भरण्यास सुरुवात करण्यात आली होती. पावसाळा सुरू होवून महिना उलटला तरी पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. महागडी खते- बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. शेतीची मशागत करून चाढ्यावर मुठ धरण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. मात्र वरूणराजाने पाठ दाखवली आहे.

Unique initiative taken by the villagers for rain in osmanabad
पाऊस पडावा म्हणून महादेव पिंड घातली पाण्याखाली! पहा व्हिडीओ   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विनोद बाकले विचारमंच व ग्रामस्थांच्या वतीने पावसासाठी ग्रामदैवत श्री महादेव पिंडीसह संपूर्ण गाभारा पाण्यात ठेवण्यात आला
  • दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी गाभारा पाण्याने भरला – विनोद बाकले
  • तीन वर्षापूर्वी दुष्काळाच्या परस्थितीदरम्यान भाविकांनी गावातील महादेव पिंड व गाभारा असाच पाण्याने भरला होता

उस्मानाबाद : भल्या पहाटे चिमुकल्यासह तरुण व ग्रामस्थांनी एकत्र येत टँकर व बोअरचे पाणी खांद्यावर घागर घेऊन श्री महादेव पिंड गाभारा पाण्याने भरला आहे. जुलै महिना सुरु झाला असून देखील उस्मानाबाद शहराच्या आसपास अनेक गावांमध्ये अद्याप पावसाचा एक थेंब देखील पडला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस  पडावा यासाठी ग्रामस्थ आभाळाकडे आस लावून बसला आहे. दरम्यान, पाऊसच पडत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्यांसाठी सारोळा (बुद्रुक ता.जि. उस्मानाबाद) येथे विनोद बाकले विचारमंच व ग्रामस्थांच्या वतीने पावसासाठी ग्रामदैवत श्री महादेव पिंडीसह संपूर्ण गाभारा पाण्यात ठेवण्यात आला आहे. आपण अनेकवेळा कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात मात्र सारोळा गावात विनोद बाकले यांनी थेट पाऊस पडावा आणि शेतकरी सुखी व्हावा यासाठी श्री महादेव पिंड गाभारा पाण्याने भरला आहे.

अधिक वाचा ; महाराष्ट्रात १९९८१ कोरोना Active, आज ३१४२ रुग्ण, ७ मृत्यू

दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी गाभारा पाण्याने भरला – विनोद बाकले

उस्मानाबाद जिल्ह्यतील सारोळा येथील श्री महादेव मंदिरात पहाटेपासूनच महादेव पिंड पाण्याने भरण्यास सुरुवात करण्यात आली होती. पावसाळा सुरू होवून महिना उलटला तरी पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. महागडी खते- बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. शेतीची मशागत करून चाढ्यावर मुठ धरण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. मात्र वरूणराजाने पाठ दाखवली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात, यासाठी विनोद बाकले विचारमंच व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.

अधिक वाचा : बंडखोर आमदारांचा मतदारसंघात पोहचताच बदलला सूर 

तीन वर्षापूर्वी दुष्काळाच्या परस्थितीदरम्यान भाविकांनी गावातील महादेव पिंड व गाभारा असाच पाण्याने भरला होता

गावातील ग्रामदैवत महादेवाची पिंड व संपूर्ण गाभारा चक्क पाण्याने भरून देवालाच पाण्यात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे हजारो घागरी पाणी चक्क खांद्यावर आणुन पिंडीसह गाभारा पाण्याने भरण्यात आला. लवकर पाऊस पडू दे...पेरणी होऊ दे व बळीराजाचे राज्य येऊ दे असे साकडे यावेळी ग्रामस्थांच्या वतीने घालण्यात आले. विशेष म्हणजे गत तीन वर्षांपूर्वीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळेस जाणकार व्यक्ती व भाविकांनी गावातील महादेव पिंड व गाभारा असाच पाण्याने भरला होता. त्यानंतर अवघ्या काही तासातच पाऊस झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. पावसाअभावी भयावह स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी गावातील तरुणांनी एकत्र येत महादेव पिंडीसह संपूर्ण गाभारा पाण्याने भरला आहे. त्यामुळे तरुण आणि ग्रामस्थांच्या हाकेला साथ देऊन पाऊस कोसळणार का याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : माझ्याकडून झालं मोठं पाप, सेना MP ला 'या' गोष्टीचा पश्चाताप

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी