'या' निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, 10 पैकी 9 जागांवर विजय

University cinet election mahavikasaghadi won 9 out 10 seats ; निवडणुकीत महाविकासआघडीच्या पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर ज्ञानतीर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

University cinet election mahavikasaghadi won 9 out 10 seats
'या' मोठ्या निवडणुकीत महाविकासआघाडीचा डंका  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर महाविकासआघाडीचा विजय
  • पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण 41 उमेदवार उभे होते
  • पदवीधर अधिसभा सिनेट निवडणुकांचा निकाल 17 नोव्हेंबर रोजी गुरुवारी समोर आला आहे.

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या दुसऱ्या टप्प्यातील पदवीधर अधिसभा सिनेट निवडणुकांचा निकाल १७ नोव्हेंबर रोजी गुरुवारी समोर आला आहे. या निवडणुकीत महाविकासआघडीच्या पॅनलने मोठा विजय मिळवला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकीत 10 पैकी 9 जागांवर ज्ञानतीर्थ पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याने महाविकास आघाडीच्या पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा ; चार वर्षे वडील, आजोबा, चुलत्याकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार

पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण 41 उमेदवार उभे होते

दरम्यान, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या पदवीधर निवडणुकीत दहा जागांसाठी विविध पॅनलचे एकूण 41 उमेदवार उभे होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर शांतिनाथ बनसोडे निवडणूक सहाय्यक कुलसचिव रामदास बेलदेवाड, विद्यापीठातील अधिकारी तसेच शिक्षक कर्मचारी यांच्या नियोजनात निवडणूक प्रक्रिया शांततेमध्ये पार पडली असून, 13 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीमध्ये खुला प्रवर्ग पाच, भटक्या विमुक्त महिला एक, अनुसूचित जाती एक, अनुसूचित जमाती एक आणि ओबीसी एक अशा जागा राखीव करण्यात आल्या होत्या. तसेच महाविकास आघाडी पुरस्कृत ज्ञानतीर्थ पॅनल, एबीव्हीपीचे विद्यापीठ विकास मंच त्यासोबतच विद्यापीठ महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी यांनी सुद्धा उमेदवार उभे केले होते.

अधिक वाचा ; बाळा नांदगावकरांचा संताप,"त्याचा ऑन द स्पॉट एन्काऊंटर करावा" 

 उमेदवार सिनेट निवडणुकीत आले निवडून 

1) नारायण चौधरी, 2) पतंगे विक्रम, 3) पाटील युवराज 4) माने विनोद 5) मगर महेश हे खुल्या प्रवर्गातून निवडून आले आहेत. अनुसूचित जाती - बंटी अजय गायकवाड, अनुसूचित जमाती - बालाजी रेजीतवाड व भटक्या विमुक्त - गजानन आसोलकर हे विजयी झाले आहेत. तर, ओबीसी - हनमंत कंधारकर, महिला - शितल सोनटक्के, या विजयी झाल्या आहेत.

अधिक वाचा ; लग्न पत्रिकेचा मायना, चारोळी अन् आमंत्रण पत्रिका मराठीत

अधिक वाचा ; म्हातारपणात प्रेमात वेडी झालेल्या महिलेनं पतीची केली हत्या

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी