children vaccination planning राज्यात ११ ते २० वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ , राज्य सरकार केंद्राकडे करत आहे 'ही' आग्रहाची मागणी

vaccination state urged for immunization of children planning : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ – २० वयोगटातील मुलांच कोरोनाचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकार सतत आणि आग्रहाची मागणी करत असल्याचं म्हटलं आहे.

vaccination state urged for immunization of children planning
राज्यात ११ ते २० वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जगभरामध्ये आता ११ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे
  • राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे
  • पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात - टास्क फोर्स

children vaccination planning  जालना : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ – २० वयोगटातील मुलांच कोरोनाचे लसीकरण व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकार सतत आणि आग्रहाची मागणी करत असल्याचं म्हटलं आहे. कारण, गेल्या काही दिवसांमध्ये ११ ते २० वयोगटातील मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जालना येथे पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी अशी माहिती दिली आहे. राज्यातील कोविड टास्क फोर्सचे देखील मुलांच्या लसीकरण करण्यात यावे असे मत आहे. या मुलांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार रोखण्यासाठी हे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, ३० नोव्हेंबरपर्यंत लसीचा पहिला डोस १०० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे देखील टोपे यांनी म्हटलं आहे.  

जगभरामध्ये आता ११ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे

दरम्यान, ११ ते १८ या वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. जर या वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्याचा प्रसार हा वृद्ध वयोगटातील व्यक्तींना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे या वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्याने केंद्राकडे आग्रह धरला असल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर टोपे म्हणाले की , जगभरामध्ये आता ११ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु आहे. आपल्याकडे या वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु नाही. मात्र, आम्ही सतत मागणी करत आहोत. असंही टोपे म्हणाले.

राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे

या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. राज्यातील लसीकरणावर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. मात्र, १०० टक्के लोकांना लसीचा पहिला डोस लवकर पूर्ण करण्यात येईल. 

पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात - टास्क फोर्स

अनेक महिने लहान मुले शाळेत गेलेली नाहीत. त्यामुळे पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करुन मगच शाळा सुरु कराव्यात असा सल्ला टास्क फोर्सने दिला आहे. दरम्यान, राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं आणि मगच शाळा सुरु कराव्यात असा आग्रह करण्यात येत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी