Vinayak Mete Death : विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल पत्नी ज्योती मेटे यांनी व्यक्त केला संशय, चौकशी करून सत्य समोर आणण्याची केली मागणी

विनायक मेटें  यांचा अपघात आहे की घातपात याबद्द मलाही संशय वाटतो अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे. तसेच या घटनेची चौकशी व्हावी आणि जे काही सत्य असेल ते समोर यावे अशी मागणीही ज्योती मेटे यांनी केली आहे.

थोडं पण कामाचं
  • विनायक मेटें  यांचा अपघात आहे की घातपात याबद्द मलाही संशय वाटतो
  • अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे.
  • तसेच या घटनेची चौकशी व्हावी आणि जे काही सत्य असेल ते समोर यावे अशी मागणीही ज्योती मेटे यांनी केली आहे.

Vinayak Mete Death : बीड :  विनायक मेटे  यांचा अपघात आहे की घातपात याबद्दल मलाही संशय वाटतो अशी प्रतिक्रिया विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिली आहे. तसेच या घटनेची चौकशी व्हावी आणि जे काही सत्य असेल ते समोर यावे अशी मागणीही ज्योती मेटे यांनी केली आहे. (Vinayak Mete shivsangram leader of maratha reservation death wife jyoti mete demand probe )

अधिक वाचा : Vinayak Mete: विनायक मेटेंसोबत घात की अपघात?, भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले...

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला होता. दुसर्‍या दिवशी १५ ऑगस्टला यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनाय मेटे यांच्या मृत्यूबद्दल कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला आहे. आता विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही मेटे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या की, तीन तारखेलाही असाच एक वाईट प्रकार घडला होता. त्या दिवशीही मेटे साहेबांची गाडी दुसर्‍या गाडीवर आदळावी अशा प्रकारे ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. या घटनेचा आणि अपघाताचा काही संबंध आहे का हे तपासणे गरजेचे आहे असे मेटे म्हणाल्या.  

अधिक वाचा : Vinayak Mete : विरोधकांचा दिलदार दोस्त! विनायक मेटेंच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, मुख्यमंत्र्यांसह विरोधकांनी व्यक्त केला शोक

मेटे यांचे सहाकारी अण्णासाहेब मायकर म्हणाले की, तीन तारखेला मेटेंसोबत प्रवास करताना चुकीच्या पद्धतीने आपली गाडी ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु त्या गाडीतील मुलं दारू प्यायलेली असावीत असा अंदाज मेटेंनी व्यक्त केला आणि तो प्रकार मेटेंनी फार गांभीर्याने घेतला नाही. मी जेव्हा पहिल्यांदा मेटे साहेबांना पाहिले तेव्हा त्यांच्या कानातून आणि डोळ्यांतून रक्त येत होतं. मेटेंचे शरीर पूर्ण पांढरे पडले होते. मेटेंची मी नाडी तपासली आणि बराच वेळ काय झाले हे कळालेच नाही असे ज्योती मेटे म्हणाल्या.

अधिक वाचा : Vinayak Mete accident: अपघात झाल्यानंतर विनायक मेटेंना तासभर नाही मिळाली मदत - चालकाचा गंभीर आरोप

या घटनेचा तपास कसा सुरू आहे, तपास कोण करत आहे याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे ज्योती मेटे म्हणाल्या. मेटे यांच्या मृत्यूवर आपल्यालाही शंका आहे, या घटनेची पूर्ण निष्पक्षपातीने चौकशी झाली पाहिजे अशी आमची आणि संपूर्ण शिवसंग्रामची भूमिका आहे. जे काही सत्य असेल ते सगळ्यांच्या समोर आले पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.

अधिक वाचा :  विनायक मेटेंच्या अपघातासाठी कारचालकाची डुलकी कारणीभूत असावी; अजित पवारांना शंका

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी