जालन्यात नराधमांची प्रेमी जोडप्याला मारहाण, मुलीची गचंडी पकडून ओढत नेलं

जालन्यात एका प्रेमी युगुलाला मारहाण होत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.  प्रेमीयुगुलापैकी तरुणी ही विदर्भातील दिग्रस येथील आहे. तर तिचा मित्र हा बुलडाणा जिल्हयातील सावखेडा गावचा असल्याची माहिती पोलि

 viral video of couple attacked in jalna home minister anil deshmukh first reaction crime news in marahti tcri 82
जालन्यात नराधमांची प्रेमी जोडप्याला मारहाण, मुलीची गचंडी पकडून ओढत नेलं 

थोडं पण कामाचं

  • जालना तालुक्यातील गोंदेगावनजीकच्या तळ्याकाठी प्रेमीयुगुलाला स्थानिक चार तरुणांनी मारहाण
  • २९ जानेवारी घडली. ही घटना ३१ जानेवारी एका चित्रफितीव्दारे उघडकीस आली.
  • प्रेमीयुगुलापैकी तरुणी ही विदर्भातील दिग्रस येथील आहे. तर तिचा मित्र हा बुलडाणा जिल्हयातील सावखेडा गावचा

जालना : जालना तालुक्यातील गोंदेगावनजीकच्या तळ्याकाठी प्रेमीयुगुलाला स्थानिक चार तरुणांनी मारहाण केल्याची घटना २९ जानेवारी घडली. ही घटना ३१ जानेवारी एका चित्रफितीव्दारे उघडकीस आली. या प्रकरणात थेट मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे. जालना पोलीस अधीक्षकांनी तपासासाठी काही पथके तयार केल्यानंतर एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून इतर तीन जणांची नावे उघडकीस आले आहेत. आरोपी अल्पवयीन आहेत की सज्ञान हे अद्याप उघड झालेलं नाही. प्रेमीयुगुलापैकी तरुणी ही विदर्भातील दिग्रस येथील आहे. तर तिचा मित्र हा बुलडाणा जिल्हयातील सावखेडा गावचा असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

अनिल देशमुख यांनी घटनेवर ट्विट करत सांगितलं आहे की, “जालन्यात घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे याचा व्हिडिओ व्हायरल होत होता त्याला थांबवण्याचे आदेश दिले गेलेले आहे. तसेच आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार”.

व्हायरल व्हिडीओत काहीजण मिळून दोघांना बेदम मारहाण करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर टोळक्यातील तरुण तरुणीला कॉलर पकडून फरफटत नेत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे दोघं वारंवार विनंती करत असूनही त्यांना मारहाण केली जात आहे. तरुण आम्ही चुकीचं काही केलं नाही. इथे तळं होतं म्हणून आलो. दादा प्लीज, यानंतर नाही होणार असं सांगत गयावया करताना दिसत आहे. टोळक्यातील तरुण मात्र कोणतीही दया दाखवत नाहीत. उलट तरुणीच्या वडिलांना बोलाव असं सांगत आहेत. तरुण त्यांच्यासमोर रडू लागल्यानंतर रडू नको आम्ही माजलेली डुकरं आहोत असंही ते सांगताना दिसत आहेत. पोलिसांनी कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरु आहे.

पोलिसांनी ही तातडीने घटनेचा गांभीर्य लक्षात घेत चौघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आमच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांची संपर्क साधला असता अधीक्षकांनी सांगितले की आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहे. ३५४,३२४,२९४,५०४,५०६ या कलमानुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी