मोठा घोटाळा, भूमाफियांनी वक्फ बोर्डाच्या तब्बल ३५ हजार एकर जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप , बडे मासे गळाला लागण्याची शक्यता

waqf board land scam : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब यांच्या ७१ एक्कर ८९ गुंठे जमीन घोटाळ्यात अप्पर जिल्हाधिकारी एन. आर. शेळकेला अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

waqf board land scam
वक्फ बोर्डाच्या तब्बल ३५ हजार एकर जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे बोलले जात आहे
  • जमीन घोटाळ्याची सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी
  • सुरेश धस यांच्यावर देखील करण्यात येत आहेत आरोप

waqf board land  | औरंगाबाद : ३५ हजार एकर जमिनीवर भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात कब्जा केल्याचा आरोप होत आहे. सदर कब्जा हा मराठवाड्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनीवर (waqf board ) झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात मराठवाड्यात तब्बल १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, यापेक्षा मोठी बाब म्हणजे सदर प्रकरणात बडे राजकीय नेते आणि महसूल खात्यातील बडे अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे.

प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे बोलले जात आहे

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या देवस्थान आणि वक्फ जमिनिच्या घोटाळ्यातील प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागला असल्याचे बोलले जात आहे. तर बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील दर्गा गैबीपीर साहेब यांच्या ७१ एक्कर ८९ गुंठे जमीन घोटाळ्यात अप्पर जिल्हाधिकारी एन. आर. शेळकेला अटक केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात अनेक देवस्थान आणि वक्फ जमिनिवर भूमाफीयांनी  गिळंकृत केली आहेत. याप्रकरणी महाराष्ट्रात आतापर्यंत १३ तर मराठवाड्यात ७ गुन्हे दाखल झाले आहेत. 

जमीन घोटाळ्याची सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी

एमआयएम खासदार इम्तियाज जलील या सर्व देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्याची सीआयडी आणि सीबीआयकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. औरंगाबाद शहरातील जालना रोडवर उभा राहिलेला इमारतींची जागा ही वक्फ बोर्डाची असल्याचा जलील यांनी आरोप केला आहे. 

सुरेश धस यांच्यावर देखील करण्यात येत आहेत आरोप

भारतीय जनता पार्टीचे नेते सुरेश यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटलं आहे की, धस यांनी देवस्थान आणि वफ्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांच्या जागांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तर या प्रकरणाची आधीच चौकशी झालेली आहे, हे आरोप खोटे आहेत. नवाब मलिक यांना कोण माहिती पूरवतंय याचं मला आश्चर्य वाटतं. त्यामुळे मालिकांनी असं बेजबाबदारपणे बोलू नये असे आमदार सुरेश धस यांनी मलिक यांनी केलेल्या आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे. 

कोणत्या मालमत्ता हडप केल्याचा करण्यात आल्या असल्याचा आरोप?

१)  दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी२) दर्गाह हजरत मौलाना साहेब, पैठण ता. पैठण जि. औरंगाबाद
३) दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी
४) दर्गाह कोचकशाह वली ऊर्फ शहिन्शाह वली, रहे, बीड
५) लाल मस्जीद, परतुर जि. जालना
६) दर्गाह हजरत जियाऊद्दिन रफाई देगलूर जि. नांदेड
७) दर्गाह बु-हान शाह वली, इदगाह व कब्रस्तान, जिंतुर रोड परभणी 

दरम्यान, यापेक्षा आणखी काही मालमत्ता हडपल्याचा आरोप केला जात आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी