जालना : 'वाईन आरोग्यासाठी हानीकारकच असून, आम्ही कोणालाही वाईन घ्या म्हणून निमंत्रण देत नाही' असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने मात्र हा निर्णय चांगला असल्याचंही टोपे यांनी म्हटल आहे. राज्य सरकारने मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याचा परवानगी दिली आहे. त्यानंतर विविध स्तरातून सरकारने घेतलेल्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. भाजप देखील आता सरकारला घराण्याच्या तयारीत दिसत आहे.
अधिक वाचा : नोकरदारांना सामान्य अर्थसंकल्पात मिळू शकतात या भेटवस्तू
शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने बोलताना टोपे म्हणाले की, ''वाईन आरोग्यासाठी हानीकारकच आहे. पण शेतीच्या अर्थकारणाच्या दृष्टीने वाईन विक्रीचा निर्णय घेतला असून सरकार वाईन विक्रीला प्रोत्साहन देत नाही त्यामुळे या निर्णयाकडे शेती आणि शेतीच्या अँगलने बघावे.'' दरम्य़ान किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे वाईन विक्री केल्यास त्याचे विपरीत परिणाम होतील असे काही जणांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा : अर्थसंकल्पात वर्क फ्रॉम होम करणार्यांचा होणार फायदा
अर्थसंकल्पात आरोग्य विभागाला झुकतं माप द्यावं, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यांना आरोग्यविभागासंबधी बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा. तसंच केंद्र पुरस्कृत मेडिकलकॉलेज साठीही तरतूद व्हावी. अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी उद्या सादर होणाऱ्या बजेटमधून व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागांतील नागरिकांच्या आरोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा असंही टोपे म्हणाले.
अधिक वाचा : फिटनेस टेस्टमध्ये झाला होता फेल, संघातून बाहेर आहे हा खेळाडू
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतला आहे, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतं असून, मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाही परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारच्या या नियमानुसार, ज्या दुकानात आधी वाईन येईल, ते दुकानच आम्ही फोडणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्यासमोर मी ही कृती करणार असल्याचं जलील यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या वाईन विक्रीच्या धोरणाला खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र शब्दात विरोध केला आहे. तसेच यावेळी त्यांनी केवळ टीका न करता सरकारला इशारा दिला आहे.