उस्मानाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी निवडणूक आयोगावरचं संशय व्यक्त केला आहे. निवडणुक आयोगाच्या मनात निकालाबाबत द्विधा अवस्था असल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाकडे भक्कम कागदपत्रे आहेत. कागदपत्रे पाहून काय निर्णय द्यायचा या विवंचनेत निवडणूक आयोग आहे. (We have strong evidence but Election Commission is hesitant about the decision - MP Omraj Nimbalkar)
मात्र, निकाल काहीही लागो शिवसेना आणि ठाकरे गट हे नाते कोणीही तोडू शकत नाही असं निंबाळकर म्हणाले. त्याचबरोबर मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक कशा पद्धतीने होते हे सर्वांना माहित आहे. स्वायत संस्थेने सद्सद् विवेक बुद्धीने निर्णय घेतला तर ठाकरे यांनाच चिन्ह मिळेल असेही ओमराजे म्हणाले.
निकाला काही आला तर आम्ही पाठिशी राहणार आहोत - खासदार ओमराजे निंबाळकर
पुढे बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, निकाल काही आला तर आम्ही मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणार आहोत. इंदिरा गांधीबाबत हेच घडले मात्र जनतेने पाठिंबा दिला. एखाद्याला पक्षातून पूर्णपणे बेदखल करुन पक्ष कॅप्चर करणे हे सामान्य माणसाला आवडले नाही. इंदिरा गांधी यांना काँग्रेसमधून काढणाऱ्या लोकांना 1971 साली केवळ 16 जागा मिळाल्या आता याच इतिहासाची पुनवृत्ती होणार आहे. 1971 ला प्रसार माध्यमे नव्हती त्यावेळी गांधी यांनी चिन्ह गावोंगावी पोहचवले. आता काही सेकंद लागतात पक्ष चिन्ह पोहचवायला, आम्ही तयार आहोत असे ओमराजे म्हणाले.