छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar)महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभेत भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यावेळी पंतप्रधान (Prime Minister)नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले अशी टीका नेहमीच उद्धव ठाकरेंवर केली जाते. या टीकेला उद्दव ठाकरे यांनी जाहीर सभेतूनच प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय? असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला. (What were you licking of mindhe for power; Uddhav Thackeray strongly attacked BJP)
अधिक वाचा : अभिनेत्री परिणीती चोप्रा आप नेता राघव चड्डाच्या प्रेमात
"सत्तेसाठी मी तळवे चाटले अशी टीका अमित शाहांनी पुण्यात केली होती. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही. पण, काही शब्द, भाषा त्यांनाच शोभणारी आहे, मला ती शोभणार नाही. आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटतो, तर तुम्ही सत्तेसाठी शिंदेंचं काय चाटताय?" असा टोला उद्धव ठाकरेंनी अमित शहा यांना प्रत्युतरात लगावला.
नितीश कुमारांचं काय चाटत होता?
नितीश कुमार आणि लालूंचं सरकार तुम्ही पाडले. यानंतर तुम्ही नितीश कुमारांचं काय चाटत होता? कुणीही सोम्या-गोम्या आम्हाला काहीही म्हणणार. आम्ही गप्प बसायचं. आम्ही काहीही बोललं तर आमच्यावर खटले दाखल होणार. मोदींना काहीही म्हटलं तर मोदींचा अपमान म्हणजे ओबीसींचा अपमान. तुमचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. आज देशभरात विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जातोय असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला.
अधिक वाचा : मित्रांना,परिवाराला मराठीतून द्या महावीर जयंतीच्या शुभेच्छा
काँग्रेस सोबत गेल्यामुळे हिंदुत्व सोडलं म्हणता, मुफ्ती मोहम्मद आणि मेहबुबा मुफ्ती सोबत काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं?, असा सवालही ठाकरे यांनी केला. तुम्ही म्हणाल तो देशप्रेमी, तुम्ही म्हणाल तो देशद्रोही अशी तुमची भूमिका असेल तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केला.
अधिक वाचा : कधी आहे हनुमान जयंती? काय आहे या दिवसाचे महत्त्व?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावरुन आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता महाराष्ट्रातही मोदींच्या शिक्षणाची चर्चा होऊ लगाली आहे. आजच्या छत्रपती संभाजीनगर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या शिक्षणावरुन भाजप आणि मोदींवर निशाणा साधला.
अधिक वाचा : हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी म्हणा ही हनुमान चालीसा
आज अनेक युवकांनी पदवी मिळवली आहे, त्यांना पदवी मिळालेली नाही. अनेक पदवीधर असे आहेत त्यांना पदव्या दाखवून ही नोकरी मिळत नाही. पंतप्रधानांची पदवी दाखवा म्हणलं तर २५ हजार रुपयांचा दंड होतोय. ते कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, आपल्या कॉलेजचा विद्यार्थी पंतप्रधान झाला म्हणून त्या कॉलेजला अभिमान का वाटत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.