Shiv Sena: 'बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का नाही पळाला?' कोणी केला खडा सवाल?

औरंगाबाद
रोहित गोळे
Updated Jul 27, 2022 | 19:22 IST

Chandrakant Khaire Criticism Rebel MLA: बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का पाळला नाही? असा खडा सवाल शिवसेनेचे माजी खासदार यांनी शिंदे गटाला

why didnt rebel mla run away from balasaheb thackerays last order chandrakant khaire criticism
बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश का नाही पळाला? (फाइल फोटो) 
थोडं पण कामाचं
  • खैरेंनी बंडखोर आमदारांना दिली बाळासाहेबांच्या शेवटच्या आदेशाची आठवण
  • चंद्रकांत खैरेंची बंडखोर आमदारांवर तुफान टीका
  • चंद्रकांत खैरे म्हणतात, संजय शिरसाठांनी उद्धव ठाकरेंविरोधात बोलू नये!

Shiv Sena MLA: औरंगाबाद: औरंगाबादचे (Aurangabad) शिवसेनेचे (Shiv Sena) माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर तुफान टीका केली आहे. 'बाळासाहेबांनी सांगितलेलं की, माझ्या उद्धवला, आदित्यला सांभाळा.. पण त्याचाच या आमदारांना विसर पडला.' असं म्हणत खैरेंनी बंडखोर आमदारांवर टीका केली. (why didnt rebel mla run away from balasaheb thackerays last order chandrakant khaire criticism)

पाहा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

'मुख्यमंत्री शिंदे यांचा गट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत असून आपणच ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वक्तव्य करत आहे. मात्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या वेळेला शिवसेनेचे आमदार-खासदार यांना आवाहन केले होते की, माझ्यानंतर माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांसोबत बंडखोरी केली.'

अधिक वाचा: उद्धव ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची बाजू

'आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य का लक्षात येत नाही का?'  असा सवाल चंद्रकांत खैरे यांनी विचारला आहे. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. 

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या फक्त नावाचा वापर करायचा असून त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात काही घेणे-देणे नाही. हेच यावरून दिसून येत आहे.' 

'त्यांचा जर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार असता तर त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केलीच नसती.' असं वक्तव्यही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केलं आहे.

अधिक वाचा: 'उद्धव ठाकरेंसारखा खोटारडा, कपटी माणूस', राणेंची जहरी टीका

'आमदार संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलू नये'

दरम्यान, यावेळी चंद्रकांत खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी बंडखोरी केली. मात्र, आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने या बंडखोर आमदारांना मोठा धक्का बसला आहे.' 

अधिक वाचा: भाजपला शिवसेना संपवायची आहे -उद्धव ठाकरे

'यामुळे हे बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य करताना दिसत आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात कोणीही वक्तव्य करणार नाही मात्र औरंगाबाद शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट ठाकरे कुटुंबाविरुद्ध वक्तव्य करताना दिसून येत आहे.  त्यांनी त्यांच्या संदर्भात वक्तव्य करू नाही.' असंही खैरे यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी