लग्नमंडपात सुरेल आवाजात गाणं म्हणताना महिलेचा मृत्यू

Woman dies while singing in melodious voice in wedding tent : संगीता गव्हाणे या गाणं गात असतानाच त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला आणि त्या अचानक खाली कोसळल्या. संगीता गव्हाणे खाली कोसळताच सगळ्यांचीच धावपळ सुरु झाली. यावेळी सर्व पाहुणे मंडळी यांनी  संगीता यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्या निपचित पडल्या होत्या.

Woman dies while singing in melodious voice in wedding tent
लग्नमंडपात सुरेल आवाजात गाणंगान म्हणताना महिलेचा मृत्यू   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुमधुर आवाजात गाणे म्हणणाऱ्या एका महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
  • बँन्डच्या पथकाकडे संगीता गव्हाणे यांनी केली होती माईकची मागणी
  • गाणं गात असतानाच संगीता गव्हाणे अचानक खाली कोसळल्या

परभणी : सुमधुर आवाजात गाणे म्हणणाऱ्या एका महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर महिलेचे नाव संगीता गव्हाणे असं होत. संगीता गव्हाणे या गृहरक्षक दलात (होमगार्ड) कार्यरत होत्या. परभणी येथील पाथरी रोडवरील एका मंगलकार्यालयात शुक्रवारी २० मे रोजी लग्न सोहळा सुरू होता. यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

अधिक वाचा : सारा तेंडुलकरचा पारंपारिक मराठमोळा लूक तुम्ही पाहिलाय का?

बँन्डच्या पथकाकडे संगीता गव्हाणे यांनी केली होती माईकची मागणी

संगीता गव्हाणे यांना गाणे गाण्याची खूप आवड होती. त्याचा आवाज देखील खूप मधुर होता. पाथरी रोडवरील एक लग्नसोहळा पार पडत असताना यजमान मंडळीसह वऱ्हाडी, नातेवाईक, आप्तेष्टांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. दरम्यान,  लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. अगदी ढोलताशेही वाजत होते. या विवाह सोहळ्यात संगीता गव्हाणे देखील उपस्थित होत्या. यावेळी संगीता यांना गाणं म्हणण्याचा मोह आवरला नाही. आणि त्यांनी बँन्डच्या पथकाकडे माईकची मागणी केली. बँन्डच्या पथकाने जसा संगीता यांना माईक दिला लगेच संगीता यांनी  आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणायला सुरुवात केली. यावेळी संगीता गाण्याचा आनंद लुटत असताना अचानक असं काही घडलं की संपूर्ण कार्यालयात एकच गोंधळ उडाला.

अधिक  वाचा ; Happy Brother's Day 2022 Images : ब्रदर्स डे शुभेच्छा फोटो 

गाणं गात असतानाच संगीता गव्हाणे अचानक खाली कोसळल्या

दरम्यान, संगीता गव्हाणे या गाणं गात असतानाच त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला आणि त्या अचानक खाली कोसळल्या. संगीता गव्हाणे खाली कोसळताच सगळ्यांचीच धावपळ सुरु झाली. यावेळी सर्व पाहुणे मंडळी यांनी  संगीता यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्या निपचित पडल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी संगीता यांना तपासले आणि मृत घोषित केले आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अधिक वाचा ;  टीम इंडियामध्ये पुन्हा निवड झाल्यावर दिनेश म्हणाला असं काही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी